22 October, 2026

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत मद्यविक्री बंद

          ⏺️ २३ ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्रीला मनाई

    हिंगोली, दि. २२ ऑक्टोबर (जिमाका) : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने २३ ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

            या आदेशानुसार, हिंगोली जिल्ह्यातील एफएल-२, एफएल-३, एफएल/बीआर-२, सीएल-२, सीएल-३ आणि ताडी दुकानांच्या अनुज्ञप्तीधारकांनी २३ ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवावी.

            आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment