26 November, 2025

दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम सुरू

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण 13 हजार 500 दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिव्यांगांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला असून, जिल्हा रुग्णालयाच्या लगत असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यालयात ही पडताळणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया दि. 26 नोव्हेंबर 2025 पासून दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत दिव्यांग मंडळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोलीमार्फत पार पाडली जाणार आहे. दिव्यांगांची गैरसोय होऊ नये म्हणून दररोज 70 दिव्यांगांची नोंदणी करण्यात येणार असून, नोंदणीची वेळ सकाळी 11 ते दुपारी 4 अशी राहणार आहे. नोंदणीसाठी दूरध्वनी क्रमांक 02456-299200 उपलब्ध करून देण्यात आला आहे. दिव्यांग बांधवांनी या विशेष पडताळणी मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. यु. मुंगल यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment