29 December, 2025
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत एबीपी फेलो नियुक्ती व मानधनासाठी बाह्यस्त्रोत यंत्रणेची निवड करण्यासाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : नीती आयोगाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कार्यक्रमांतर्गत आकांक्षी तालुका कार्यक्रमातील सहकारी (एबीपी फेलो) यांच्या नियुक्ती व मानधन अदा करण्याकरिता बाह्यस्त्रोत यंत्रणेची नियुक्ती करण्यात येणार आहे.
एबीपी फेलो या पदास ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून, संबंधित फेलोना प्रतिमाह 55 हजार रुपये इतके मानधन अनुज्ञेय राहणार आहे.
या अनुषंगाने इच्छुक व पात्र पुरवठादार/संस्थांनी आपले दरपत्रक सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयास आजपासून 5 जानेवारी 2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत.
यासाठी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संस्थेचे मागील वर्षापर्यंतचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असावे. तसेच मानधनामधील कपातीबाबत स्वयंस्पष्ट दरपत्रक सादर करणे अनिवार्य राहील. या अटी व शर्तीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी सीलबंद लिफाफ्यात दरपत्रक सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment