महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाचे 2020 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
हिंगोली,दि.3: महाराष्ट्र लोकसेवा
आयोगातर्फे 2020 मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले
आहे. राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची मुख्य परीक्षा शनिवार पासून 3 दिवस आणि सहायक
कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार आहे. उर्वरित
सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे.
राज्यसेवा
परीक्षा 2020 साठीची जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध होईल. पूर्व परीक्षा दि.
5 एप्रिल, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि. 8 ऑगस्ट ते सोमवार दि. 10 ऑगस्ट,
2020 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व
न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी-2020 मध्ये
जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 1 मार्च रोजी तर मुख्य परीक्षा दि.
14 जून, 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
सहायक
मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020 साठी जानेवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध
करण्यात येणार असून पूर्व परीक्षा दि. 15 मार्च, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा दि.
12 जुलै, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त
परीक्षेसाठी फेब्रुवारी-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि.
3 मे, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 साठी
मार्च-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा दि. 10 मे रोजी
तर मुख्य परीक्षा दि. 11 ऑक्टोबर, 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र
अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च-2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 17 मे, 2020 मध्ये
घेण्यात येणार आहे. सदर वेळापत्रक किंवा अधिक माहिती www.mpsc.gov.in या
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment