अल्पसंख्यांक
हक्क दिन उत्साहात संपन्न
हिंगोली,दि.18: संयुक्त राज्य संघटनेने 18 डिसेंबर, 1992
रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा
स्विकृत करुन प्रस्तृत केला होता. त्याकरीता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस
आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. तसेच
अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती
व्हावी याकरीता अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर
हा दिवस ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी
कार्यालयालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिनाचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, शिक्षणाधिकारी (प्राथ.) संदिपकुमार सोनटक्के, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती
रेणुका तम्मलवार, खुदाबक्ष तडवी, असद पठाण, नजीर अहेमद शेख, मंजीतसिंग अलग, यांची
प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांनी अल्पसंख्याकांसाठी
राबविण्यात येणा-या विविध योजना यामध्ये अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह, डॉ. झाकीर हुसेन
मदरसा आत्याधुनिकीरण योजना, अल्पसंख्यांक
शासनमान्य खाजगी शाळांना पायाभूत सुविधा, मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास
महामंडळ आदि योजनांची माहिती देवून अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त सर्वांना
शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. किरण गिरगांवकर
यांनीही जिल्ह्यात अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची
सविस्तर माहिती दिली. श्री. इरशाद पठाण
यांनीही अल्पसंख्यांक विषयी आपले मनोगत
व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर मठपती यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील शालेय
विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक, मार्गदर्शक आणि अल्पसंख्यांक समाजातील
नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment