शासकीय
कापूस खरेदीचा दिनांक 9 डिसेंबर रोजी शुभारंभ
हिंगोली,दि.6 :- हंगाम 2019-20 मधील परभणी विभागातील शासकीय कापूस खरेदी सीसीआय चे सबएजंट
म्हणून कापूस पणन महासंघातर्फे हिंगोली येथे सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2019 रोजी
सकाळी 11.00 वाजता केंद्र शासनाच्या किंमत आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदीचा
शुभारंभ करण्याचे योजिले आहे.
यावर्षी कापूस खरेदी
केल्यावर शेतकऱ्यांना अदा करावयाची रक्कम आरटीजीएस/ एनईएफटी ने थेट शेतकऱ्यांच्या
खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे चालू हंगामातील कापूस पेऱ्याची अद्ययावत
नोंद असलेला 7/12 उतारा, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचे आईएफएससी कोड, बँक पासबुकच्या
पहिल्या पानाची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व शेतकऱ्यांचा बँकेशी संलग्न
(लिंक) केलेला मोबाईल नंबर व ई-दस्ताऐवज सोबत आणावेत.
वस्त्रोद्योग मंत्रालय
भारत सरकार यांचे परिपत्रकानुसार शासकीय कापूस खरेदी केंद्रावर फक्त FAQ दर्जाचाच कापूस स्विकारण्यात येणार आहे. FAQ
दर्जाच्या कापसाला रुई धाग्याची लांबी, तलमता व आर्द्रता यानुसार भाव देण्यात
येणार आहे. 12% च्या वर आर्द्रता असलेला
कापूस केंद्रावर स्विकारला जाणार नाही.
शेतकरी बांधनानी जास्तीत
जास्त कापूस शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा, असे आवाहन कापूस पणन
महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट व विभागीय व्यवस्थापक ए.डी. रेणके
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment