‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजना 2019’
जिल्ह्यातील मौजे समगा व मौजे
खरबी येथून आधार प्रमाणिकरण योजनेचा शुभारंभ
· जिल्ह्यातील 1 लाख 05 हजार
690 शेतकरी लाभार्थ्यांचे कर्जखात्याशी
आधार जोडणीचे काम पूर्ण
यावेळी
उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसिलदार श्री.
खंडागळे, सहाय्यक निबंधक जितेंद्र भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019
या योजनेची हिंगोली जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु आहे. सदर योजने अंतर्गत आजपर्यंत 1 लाख
05 हजार 690 शेतकऱ्यांचे कर्जखात्याशी आधार जोडणी झालेली आहे. त्यापैकी 96 हजार 995
इतक्या शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत,
3 हजार 500 शेतकऱ्यांनी आपले आधार ओळखपत्र आणून न दिल्याने त्यांची आधार जोडणी करण्याचे
काम प्रलंबीत राहिले आहे. आधार जोडणीचे काम शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी विनाविलंब
त्यांचे आधार ओळखपत्र संबंधीत बँक शाखेत देवून आपले आधार जोडणीचे कामकाज पुर्ण करण्यास
सहकार्य करावे, असे आवाहन योजनेसाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने केले
आहे.
या योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत पायलट प्रमाणिकरणासाठी
हिंगोली तालुक्यातील मौजे समगा व खरबी या दोन गावांची निवड करण्यात आली होती. मौजे
समगा गावातील 147 लाभार्थी तर मौजे खरबी येथील 86 लाभार्थी असे एकुण 233 लाभार्थ्यांची
यादी आज संबंधीत गावात प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणांचे
काम सुरुळीतपणे सुरु झाले आहे. मौजे समगा व मौजे खांबाळा येथील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत
बायोमेट्रिक यंत्राद्वारे हे आधार प्रमाणिकरणाचे काम करण्यात येत आहे. या 233 लाभार्थ्यांची
बँक निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
यामध्ये हिंगोली तालुक्यातील मौजे समगा गावातील महात्मा
जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अलाहाबाद बँक-01, बँक ऑफ इंडिया-28,
स्टेट बँक ऑफ इंडिया-22, युनियन बँक ऑफ इंडिया-96 असे एकूण 147 लाभार्थी शेतकरी तर
हिंगोली तालुक्यातील मौजे खरबी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये एकूण 86 लाभार्थी शेतकरी
आहेत. मौजे समगा व मौजे खरबी या दोन्ही गावात एकून लाभार्थी शेतकरी संख्या 233 अशी
आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019
करीता गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील गावांना प्रत्यक्ष भेट
देवुन आधार प्रमाणिकरणाच्या कामकाजाची पाहणी केल्याने आजपर्यंत 1 लाख 05 हजार 690 शेतकऱ्यांचे
कर्जखात्याशी आधार जोडणी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी मुळे संकटात
सापडलेल्या शेतकरी बांधवाना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे नक्कीच
दिलासा देण्याचा प्रत्यन शासनाने केला आहे . तसेच उर्वरीत 3 हजार 500 शेतकऱ्यांनी आपले
आधार ओळखपत्र विनाविलंब संबंधीत बँक शाखेत देवून आपले आधार जोडणीचे कामकाज पुर्ण करण्यास
सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यावेळी केले.
*****
No comments:
Post a Comment