08 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
हिंगोली, दि.07: मागील लोक अदालतीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील अनेक प्रकरणे निकाली
काढण्यात आली असून भूसंपादनाचे प्रकरणे निकाली काढण्यामध्ये सर्वांचे हित असून लोक
अदालतीमध्ये प्रकरणे निकाली काढल्यास आपली वेळ, पैसे व श्रमाची बचत होते.
त्याकरीता शनिवार, दिनांक 08 फेब्रुवारी 2020 रोजी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ
औरंगाबाद, जिल्हा सत्र न्यायालय हिंगोली व वसमत येथे होणा-या राष्ट्रीय लोक
अदालतीमध्ये भूसंपादनाची प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****
No comments:
Post a Comment