रोजगार मेळाव्याचे आयोजन
हिंगोली, दि.3 :सुशिक्षत बेरोजगार युवक-युवतींसाठी
खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली
व तोष्णीवाल आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 6 फेब्रुवारी, 2020 रोजी तोष्णीवाल महाविद्यालय येथे तर दिनांक 7 फेब्रुवारी , 2020 रोजी औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, हिंगोली येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यास
पॅराडईज प्लेसमेंट कन्स्लटन्सी, औरंगाबाद पेस स्किल ट्रेनिंग सेंटर, लातूर , धूत ट्रान्समिशन
प्रा. लि. औरंगाबाद , नवकिसान बायोप्लांट लिमिटेड कंपनी, जळगाव , अलाईड रिसोर्स मॅनेजमेंट
सर्व्हीस प्रा. लि. औरंगाबाद , फ्युचर मनी सोर्स इंडिया प्रा. लि. वाशिम, सेक्युरा
मल्टीस्पेशालिटी ॲन्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, वाशिम हे उद्योजक येणार असून अप्रेंटीस
ट्रेनी, इपीपी ट्रेनी, फिल्ड ऑफीसर, बोट अप्रेंटीसशिप, नीम ट्रेनी, सेल्स एक्झिक्युटीव्ह
, सेल्स सुपरवायझर, सेल्स असोसिएट या पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. रोजगार
मेळाव्यास सहभागी होण्यासाठ www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार या पर्यायावर क्लिक करुन
नोकरी साधक हा पर्याय निवडावा, युजर आयडी व पार्सवर्डद्वारे लॉग ईन करुन प्रोफाईल मधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायाद्वारे हिंगोली
जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या
दूरध्वनी 02456-224574 व डॉ. व्हि.डी. शिंदे मो-9850593939, प्रा. टी. यु. केंद्रे
मो-8275005646 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
शैक्षणिक
पात्रताधारक उमेदवारांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र,
आधार कार्ड, फोटो, सेवायोजन कार्ड घेऊन वरील पत्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक
आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता श्रीमती रेणुका तम्मलवार , तोष्णीवाल महाविद्यालयाचे
प्राचार्य एस.जी. तळणीकर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. भगत यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment