·
शैक्षणिक
वर्ष 2026-27 साठी मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 3 : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती
प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी
2.0 या नवीन प्रणालीवर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी या प्रणालीवर
आवश्यक कार्यवाही करून शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
महाडीबीटी 2.0 प्रणालीवर भारत
सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण व
परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता
शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह
भत्ता तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध
जागांवर आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने
प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण
शुल्क प्रतिपूर्ती योजना आदी योजनांचे अर्ज ऑनलाइन भरता येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यवाही
महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज
करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम नवीन महाडीबीटी तयार करणे आवश्यक
आहे. यासाठी मागील पोर्टलवरील युजर आयडी व पासवर्डची आवश्यकता
राहणार नाही. आधार क्रमांकात आवश्यकतेनुसार बदल असल्यास नवीन महाडीबीटी तयार
करताना आधार क्रमांकाद्वारे नवीन महाडीबीटी तयार करावा.
विद्यार्थ्यांनी नवीन महाडीबीटी
तयार करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करून पोर्टलवर स्वतःची माहिती, जसे की
पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल तसेच बँक खात्याची माहिती अद्ययावत करावी. आवश्यक
कागदपत्रे, जसे की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र व शैक्षणिक
प्रमाणपत्रे यांची माहिती भरावी.
नवीन व नूतनीकरण अर्जासाठी नवीन महाडीबीटी/आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी
लॉगिन करून अर्ज नूतनीकरण करणे ही विशिष्ट टप्प्यांची बाब असल्याचे सूचित करण्यात
आले आहे.
भारत सरकार मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम थेट
त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करावा ?
विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलचा
वापर करून ऑनलाइन अर्ज करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस पोर्टलवर लॉगिन करून
नोंदणीसाठी ‘नवीन महाडीबीटी नोंदणी’ हा पर्याय
निवडावा. त्यानंतर आधार संलग्नित मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे अद्ययावत केल्यानंतर
लॉगिन करता येईल.
लॉगिननंतर पात्र योजनांची माहिती
अद्ययावत केल्यानंतर विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या विभागनिहाय योजनांची यादी
उपलब्ध होईल. त्यानंतर निवडलेल्या योजनेसमोरील ‘Apply’
टॅबवर क्लिक करून अर्ज भरावा. अर्जाची ऑनलाइन पडताळणी केल्यानंतर अर्जाची प्रत
डाउनलोड करून प्रिंट जतन करून ठेवावी.
महाविद्यालयांचीही महत्त्वाची जबाबदारी
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना
ऑनलाइन नोंदणी व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही
पात्र विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या शिक्षण शुल्कापोटी कोणतेही शुल्क घेऊ नये, अशी
सूचना करण्यात आली आहे.
महाविद्यालयाने आपल्या संस्थेचे
नाव, अभ्यासक्रमाचे नाव, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमानिहाय प्रवेश क्षमता
तसेच महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचे मान्यतेचे विविध आदेश, शुल्क रचना आदी माहिती
महाडीबीटी पोर्टलवर भरण्यासाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणांकडून प्रमाणित करून
घ्यावी.
तांत्रिक अथवा अभ्यासक्रमाशी
संबंधित अडचणी असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा. प्राध्यापकांनी
विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण
होण्यासाठी सहकार्य करावे. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना
देय असलेली निर्वाह भत्ता व इतर शिष्यवृत्ती योजनांची रक्कम विद्यार्थ्यांच्या
आधार संलग्नित बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
महाडीबीटी २.० प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
सुलभ करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळेत आवश्यक
कार्यवाही करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गीता
गुठ्ठे यांनी केले आहे.
******
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


