25 September, 2016

जिल्ह्यावार्षिक सरासरीच्या 92.52 टक्के पावसाची नोंद

          हिंगोली, दि. 25 :- जिल्ह्यात रविवार, दिनांक 25 सप्टेंबर, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 31.85 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  6.37  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 823.75 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 92.52 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात रविवार, दिनांक 25 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली – 3.29 (829.16), वसमत – 12.14 (875.82), कळमनुरी – 8.67 (818.47), औंढा नागनाथ – 4.25  (916.50), सेनगांव – 3.50 (678.82). आज  अखेर  पावसाची सरासरी 823.75 इतकी आहे.
****


स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त अभिवादन

          हिंगोली, दि. 25 :-  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांनी स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती होती.

****  


24 September, 2016

नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा
--- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
          हिंगोली, दि. 24 :- येथील जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी जिल्ह्यात 48 तासात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सावधगिरीची सुचना दिल्या आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी / नागरिक यांना खालील खबरदारी घेण्याबाबत कळविले आहे.
                विशेषत: शेतकऱ्यांनी विजांचा कडकडाट होत असतांना शेतीचे काम करु नये. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे व स्वत: सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ जाऊ नये. तसेच आपल्या मुलांना जलसाठ्याजवळ पोहण्यासाठी पाठवू नये. ( शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सुचित करावे.) पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये.

*****
आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी आवाहन
          हिंगोली, दि. 24 :- नामांकीत निवासी इंग्रजी शाळा प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दोन जिल्हयातील (परभणी व हिंगोली ) सर्व पालकांना सुचित करण्यात येते की, इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये दरवर्षी या कार्यालयामार्फत प्रवेश देण्यात येतात. मात्र त्याकरीता खालील प्रमाणे अटी व शर्ती आहेत.
1) पालकांचे उत्पन्न्‍ प्रमाणपत्र (1 लाखापेक्षा कमी), 2) पालक शासकीय नोकरीत नसल्याचे प्रमाणपत्र 3) पालकाचे जातीचे प्रमाणपत्र, 4) जन्माचा दाखला / शाळा शिकत असल्याचा दाखला, 5) वैद्यकीय प्रमाणपत्र.  या सर्व बाबींची पुर्तता झाल्यासच विद्यार्थी पात्र होतो. वरील प्रमाणपत्र चुकीचे आढळुन आल्यास पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही पालकांनी परस्पर विध्यार्थ्याना शाळेत प्रवेशित करू नये. तसेच सर्व शाळांना सुचित करण्यात येते की, त्यांनी विद्यार्थी परस्पर कार्यालयाच्या आदेशाविना प्रवेशित करु नये, तसे केल्यास सदर विद्यार्थ्याची संपुर्ण जबाबदारी शाळेची राहील, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 45.32 मि.मी. पावसाची नोंद
औंढा नागनाथ तालुक्यात सर्वाधिक पाऊस
          हिंगोली, दि. 24 :- जिल्ह्यात शनिवार दिनांक 24 सप्टेंबर, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 226.62 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  45.32  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 817.38 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 91.81 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) औंढा नागनाथ - 108.91, हिंगोली - 98.60, वसमत - 86.43, कळमनुरी - 86.19, सेनगांव - 80.63 जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  91.81 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात शनिवार दिनांक 24 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 51.00 (825.87), वसमत - 31.29 (863.68), कळमनुरी - 28.50 (809.80), औंढा नागनाथ - 84.50  (912.25), सेनगांव - 31.33 (675.32). आज  अखेर  पावसाची सरासरी 817.38 इतकी आहे.

***** 

23 September, 2016

शेतकऱ्यांना विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 23 :- कृषि व संलग्न उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती / संस्था/गट यांना दरवर्षी राज्य शासनामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभुषण, वसंतराव नाईक शेतीमित्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण व आदिवासी गट) पुरस्कार देऊन गौरविण्यात येते . तसेच राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्‍टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास राज्य शासनाद्वारे प्रतीवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कृषि पुरस्कार सन 2016 साठीच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून कृषि विभागाच्या संकेतस्थळावर (www.mahaagri.gov.in) वर उपलब्ध आहेत. पुरस्काराचे तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे. 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या -01), उद्देश:- कृषि क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रिया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पदनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.  पुरस्काराचे स्वरुप:- रोख रुपये 75 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या:-10) उद्देश:- कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास , फलोत्पादन व ग्रामिण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतकऱ्यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अद्वितीय कार्य करणाऱ्या शेतकरी / संस्था/गटांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. स्वरुप:- रोख रुपये 50 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
जिजामाता कृषिभुषण पुरस्कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या:- 5) उद्देश:- शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेवून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप:- रोख रुपये 50 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पतीसह सत्कार .
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या:-3) उद्देश:- ज्या व्यक्ती/ संस्था, पत्रकारितेद्वारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषि क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या शेतक-यांना/व्यक्तींना/संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप:- रोख रुपये 30 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्‍कार (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या 25) :- उद्देश:- शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर, शेती पुरक व्यवसाय, स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व इतर शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण (19) व आदिवासी गटांतील (06) शेतकऱ्यांना / संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप:- रोख रुपये 11 हजार स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्कार  (एकूण द्यावयाची पुरस्कार संख्या:-25) :- उद्देश:- राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या कृषि विभागातील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप:- स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार.
महाराष्ट्र शासन, कृषि विभागाच्या मंडळ/ तालुका/उपविभागीय/जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधून पुरस्कारांकरिता पात्र शेतक-यांनी नियोजित वेळेत आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका स्तरावर सादर करावेत, असे कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य , पुणे कृषि उपसंचालक (माहिती) यांनी कळविले आहे.
****


जिल्ह्यावार्षिक सरासरीच्या 86.72 टक्के पावसाची नोंद

          हिंगोली, दि. 23 :- जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर, 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 102.94 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  20.59  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 772.06 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 86.72 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 18.29 (774.87), वसमत - 29.57 (832.39), कळमनुरी - 21.50 (781.30), औंढा नागनाथ - 24.75  (827.75), सेनगांव - 8.83 (643.99). आज  अखेर  पावसाची सरासरी 772.06 इतकी आहे.

*****