18 March, 2017

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

            हिंगोली, दि. 18 :- राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क, व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली त्यांचे दालनात दि. 20 मार्च, 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही दिन होणार आहे. ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली यांचे कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. ए. कारभारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****  

17 March, 2017

राष्ट्रीय युवा दल पदाच्या प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 17 : नेहरु युवा केंद्र, हिंगोली युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार या कार्यालयात वर्ष 2017-18 साठी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक या पदासाठी युवक-युवतींची निवड करावयाची आहे. याकरिता वर्तमानपत्रातून जाहिरात देण्यात आलेली असून त्यानुसार कार्यालयात ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. ज्या उमेदवारांनी कार्यालयात अर्ज केलेले आहेत. अशा पात्र उमेदवारांनी आपले मुलाखतीचे पत्र कार्यालयातून प्राप्त करावे. आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि. 22 मार्च, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता आपल्या सर्व मुळ प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे स्व खर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा समन्वयक, चंदा रावळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि. 17 :  युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने दि. 17 मार्च, 2017 रोजी जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन सारिका पेंशनवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सय्यद जब्बार पटेल, हिंगोली श्री. गुडेवार, साजिया पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्ह्यातील युवक मंडळांच्या सांस्कृतिक संचांनी आपली कला सादर केली. नेहरु युवा केंद्राच्या कार्यक्रमासंदर्भात व या उपक्रमाबद्दल जिल्हा युवा समन्वयक चंदा रावळकर यांनी युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी युवकांनी आपल्या सस्कृतीचे दर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी प्रयत्नशिल राहावे व युवा शक्तीने राष्ट्राप्रती आपले योगदान समर्पित करावेअसे आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडविण्यात आले. यामध्ये युवक-युवतींनी, युवक मंडळ, महिला मंडळ यांनी ही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
नेहरु युवा केंद्राने केलेल्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील मान्यवर व उपस्थितांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे कौतूक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहरु युवा केंद्राच्या वतीने भगवान चंद्रवंशी, नामदेव सपाटे, मारोती चंद्रवंशी, खंडूजी वाबळे, सुमय्या पठाण, नामदेव वाबळे, आकाश चेंडके, शिवानंद नरवाडे, आदिंनी परिश्रम घेतले.

***** 
विशेष जिल्हा युवा पुरस्काराकरिता युवा/महिला मंडळानी अर्ज करावेत
        हिंगोली, दि. 17 :  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरु युवा केंद्र, हिंगोली कार्यालयाव्दारा जिल्ह्यातील नोंदणीकृत युवा / महिला मंडळाकडून विशेष जिल्हा युवा पुरस्कार 2016-17 अशा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी दि. 21 मार्च, 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
            सदरील पुरस्काराचे स्वरूप रु. 25 हजार (रुपये पंचवीस हजार फक्त) व प्रमाणपत्र असे आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या युवा मंडळाच्या प्रस्तावाचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. तरी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरणरक्षण व राष्ट्रीय अशा विविध विकासात्मक कार्यक्रम राबविणाऱ्या युवा/महिला मंडळानी आपला विहित नमुन्यातील अर्ज दि. 21 मार्च, 2017 पर्यंत नेहरु युवा केंद्र, 26, देवडा नगर, नांदेड नाका, हिंगोली येथे सादर करावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा समन्वयक, चंदा रावळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ***** 

16 March, 2017

बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे माहे एप्रिल महिन्यासाठी
1433 क्विंटलचे नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 16 :  जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे एप्रिल - 2017 या महिन्याकरीता  तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली  ( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 असे एकूण 1433 क्विंटल साखरेचे नियतन मंजुर करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ***** 

10 March, 2017

लिंबाळा परिसरात जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न
हिंगोली, दि. 10 : 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणुन सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. या दिनाच्या निमित्ताने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने MIDC परिसर लिंबाळा येथे दि. 8 मार्च 2017 रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर मेळाव्याचे अध्यक्ष पदी जिल्हाधिकारी अनिल भंडारी  तर प्रमुख अतिथी म्हणुन मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, तहसीलदार विजय अवधाने, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री कैलास तिडके, जिल्हा समन्वय श्रीमती संगीता भोंगाडे, अनिता दिनकर हे होते. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी व अनिता दिनकर यांनी उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले. तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री कैलास तिडके  यांनी उपस्थितांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास तिडके जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हिंगोली यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम. एस. सुर्यवंशी, पी. बी. खटिंग, श्रीमती तांबेताई ,श्री. राठोड, श्री.मकासरे, श्री.पांडे, श्री.घुगे, पहाडे, साबळे, कदम, रफिक, सावळे, शेळके, खैरे, रनविर व राखोंडे आदीनी परिश्रम केले.

*****
नेहरू युवा केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि
हिंगोली तालुकास्तरीय पडोस युवा सांसद कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि. 10 : युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत असणाऱ्या नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांच्या वतीने रिसाला बाजार, हिंगोली येथे दि. 8 मार्च, 2017 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय पडोस युवा सांसद जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटक उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाहेजहाँ पठाण, दिपाली काळे, विशाल सारडा, पठाण यास्मीन बेगम, लता सोनवणे आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमात चंदा रावळकर यांनी उपस्थितांना रोजच्या जीवनातील कॅशलेस व्यवहाराचे महत्व पटवून देण्यात आले तसेच कॅशलेस व्यवहार कशाप्रकारे करतात याबाबतची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. यानिमित्ताने ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहार करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात हिंगोली तालुक्यातील युवक मंडळ, महिला मंडळ आणि स्वयंसेवी व सेवाभावी संस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहरु युवा केंद्राच्या वतीने नामदेव सपाटे, भगवान चंद्रवंशी, सुमय्या पठाण, नामदेव वाबळे, आदिंनी परिश्रम घेतले.

*****