18 July, 2017

जिल्ह्यागत 24 तासात सरासरी 4.16 मि.मी. पाऊस
          हिंगोली, दि. 18 :  जिल्ह्यात मंगळवार दिनांक 18 जुलै, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 20.79 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  4.16  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 247.72 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 27.82 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  मंगळवार दि. 18 जुलै, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 0.57 (314.13), वसमत - 11.14 (195.96), कळमनुरी - 1.33 (162.68), औंढा नागनाथ - 7.75  (282.90) , सेनगांव - 0.00 (282.93). आज  अखेर  पावसाची सरासरी 247.72 नोंद झाली.

*****  

17 July, 2017

अपंग व्यक्तींनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी 21 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 17 :  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी सन 2017 मध्ये देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी खालील प्रवर्गातील पुरस्कारासाठीचे अर्ज मागविण्यात येत आहे. या अर्जांमधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अपंग कर्मचारी (स्वयंरोजगारासह) त्याचे नियुक्तक व सेवायोजन अधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे.
            उत्कृष्ट कर्मचारी -स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी संस्था, अपंग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था, प्रथित यश व्यक्ती, अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेले उत्कृष्ट संशोधन / उत्पादन / निर्मिती, अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणारे कार्यालय / संस्था, अपंग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ अपंग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य करणारे अपंग बालक, उत्कृष्ट ब्रेल छापखाना, उत्कृष्ट सहज साध्य संकेतस्थळ, अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहीत करणारे उत्कृष्ट राज्य, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी अपंग व्यक्ती. या पुरस्काराची माहिती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या www.socialjustice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरलेले अर्ज या कार्यालयास दि. 21 जुलै, 2017 रोजीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****  


स्वयंरोजगाराविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 17 : स्थानिक हिंगोली येथे युवक / युवती करिता स्वयंरोजगार वर आधारित 12 दिवसांच्या कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन दि. 18 जुलै, 2017 ते 29 जुलै, 2017 या कालावधीत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून स्वयंरोजगार रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात शेळी पालन, म्हैसपालन इत्यादी विषयी या प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात युवक युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, प्रवेशाची अंतिम तारीख 17 जुलै, 2017 रोजीच्या दु. 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक किसन धाबे मो. 9552459956 / 9960189358 एमसीईडी जिल्हा कार्यालय व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला हिंगोली येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी) चे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****  


जिल्ह्यागत 24 तासात सरासरी 15.70 मि.मी. पाऊस
सर्वाधिक पाऊस औंढा नागनाथ तालुक्यात
          हिंगोली, दि. 17 :  जिल्ह्यात सोमवार दिनांक 17 जुलै, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 78.51 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  15.70  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243.56 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 27.36 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  सोमवार दि. 17 जुलै, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 15.14 (313.56), वसमत - 17.71 (184.82), कळमनुरी - 11.83 (161.35), औंढा नागनाथ - 19.00  (275.15) , सेनगांव - 14.83 (282.93). आज  अखेर  पावसाची सरासरी 243.56 नोंद झाली.
*****  
कळमनुरी येथे स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 17 : स्थानिक कळमनुरी येथे युवक / युवती करिता स्वयंरोजगार वर आधारित 12 दिवसांच्या कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन दि. 21 जुलै, 2017 ते दि. 02 ऑगस्ट, 2017 या कालावधीत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून स्वयंरोजगार रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात शेळी पालन, म्हैसपालन इत्यादी विषयी या प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात युवक युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, प्रवेशाची अंतिम तारीख 20 जुलै, 2017 रोजीच्या दु. 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक रोकडेश्वर पतंगे मो. 9545343673 / 9146363351 एमसीईडी जिल्हा कार्यालय व्दारा पंचायत समिती कळमनुरी अथवा गणेश नगर कळमनुरी येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी) चे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****