16 January, 2018

लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा उपसा करण्यास प्रतिबंध
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू
            हिंगोली,दि.16: जिल्ह्यात पाणी आरक्षण सभा संपन्न झाली असून जिल्ह्यात उपलब्ध पाण्याची सद्यस्थिती बाबत सन 2017-18 या वर्षात दि. 31 ऑक्टोबर, 2017 अखेर 73.18 मि. मि. पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. सदर टक्केवारी ही वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प प्रमाणात आहे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी साठा कमी आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याच्या अंदाज घेतला असता भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सिंचन तलाव, पाझर तलाव आणि गाव तलाव या पाणी साठ्यातून अवैध पाणी उपसा करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंध करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पात दि. 18 डिसेंबर, 2017 रोजी पर्यंत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मध्यम व लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याव्यतिरिक्त इतर अन्य वापराकरिता पाणी साठ्याचा उपसा करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लघु व मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर अन्य प्रयोजना करिता कुठल्याही प्रकारचे माध्यमाव्दारे पाणीसाठ्याचा उपसा करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे.
             
*****
लोकराज्यच्या ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ विशेषांकाचे
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते विमोचन
            हिंगोली,दि.16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत प्रकाशित होणाऱ्या माहे जानेवारीच्या लोकराज्य ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ या लोकराज्य विशेषांकाचे विमोचन पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज करण्यात आले.  
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, सर्वसाधारण सहायक अनिल चव्हाण, यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री चावरिया म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पोलीस विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर आधारित जानेवारी-2018 चा ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ लोकराज्यचा दर्जेदार व वाचनीय असा विशेषांक प्रकाशित केला आहे.  दरमहा प्रसिध्दी होणाऱ्या लोकराज्य मासिकात शासनाच्या विविध योजनांची अधिकृत माहितीचा समावेश  असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त  असे मासिक असुन प्रत्येकाने ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ हा लोकराज्यचा पोलीस विशेषांक अवश्य घ्यावा, असे आवाहनही श्री. चावरिया यांनी यावेळी केले.  
            शासनाचे मुखपत्र असलेले या मासिकाची वाचकप्रियता आणि प्रभाव अनन्यसाधारण स्वरुपाचा असून शासन निर्णय, मंत्रीमंडळ निर्णय, राबविण्यात येणाऱ्या योजना, संकल्पना, इतर उपयुक्त माहिती घरा-घरापर्यंत पोहचविण्याचे ‘लोकराज्य’ एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. 'लोकराज्य' मासिकाची किंमत फक्त रु. 10/- इतकी असून वार्षिक वर्गणी रु. 100/- एवढी आहे. तर 'उर्दू लोकराज्य' मासिकाची किंमत रु. 5/- असून वार्षिक वर्गणी रु. 50/- एवढी आहे. तसेच 'महाराष्ट्र अहेड' या इंग्रजी मासिकाची किंमत रु. 50/- असून वार्षिक वर्गणी रु. 500/- एवढी आहे. सदर वर्गणी रोखीने किंवा धनादेशाद्वारे जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, हिंगोली येथे स्वीकारली जाते. या मासिकाचे वर्गणीदारांना सदर मासिक त्यांनी दिलेल्या पत्यावर थेट पोस्टाद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ या मासिकाचे वर्गणी भरून वर्गणीदार होण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

*****

12 January, 2018

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा सप्ताहाचे आयोजन

हिंगोली, दि. 12 : क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी  कार्यालय, हिंगोली प्राचार्य शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, श्री. पलसिद्ध स्वामी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पुसेगांव ता. सेनगांव जि. हिंगोली, विजयदीप करीअर ॲकडमी, हिंगोली, प्राचार्य बाबुराव पाटील महाविद्यालय, हिंगोली, जिल्हा परिषद प्रशाळा, हिंगोली जिल्हा कराटे असोसिएशन, हिंगोली, संत नामदेव सेवाभावी संस्था, नर्सी (ना) ता.जि. हिंगोली, युवा प्रतिष्ठाण, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 ते 19 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात युवक/युवतींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तरी आपल्या शाळा/महाविद्यालयातील युवक/युवतींना सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे युवा दिन युवा सप्ताहात सहभागी होवून आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना चालणा देण्यासाठी या संधीचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, यांनी केले आहे.
            या युवा सप्ताहमध्ये पुढीलप्रमाणे कार्यक्रम असणार आहे. 1) दिनांक 12 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान व शिकवण / त्यांचे कार्य, प्रेरणादायी विचार युवकांना अवगत करणे, स्थळ - शिवाजी महाविद्यालय, हिंगोली, 2) दिनांक 13 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगार, व्यवसाय, नोकरीतील संधीबाबत तज्ज्ञाकडून मार्गदर्शक, स्थळ - केदार ट्रेनिंग सेंटर, श्री. पलसिध्द स्वामी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, पुसेगाव ता. सेनगाव, 3) दिनांक 14 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, स्थळ- विजयदीप करीअर ॲकॅडमी, आदर्श महाविद्यालय सोसायटी बिल्डींग,  हिंगोली, 4) दिनांक 15 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 व्हॉलीबॉल स्पर्धा, इंदिरा गांधी कन्या विद्यालय, जवळा बाजार, 5) दिनांक 16 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 युवती व महिलांसाठी स्वंयसंरक्षणार्थ कार्यक्रम, स्थळ - प्रमोद वाघमारे / गोपाल ईसावे, जिल्हा परिषद प्रशाला, हिंगोली, 6) दिनांक 17 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 युवकांसाठी परिसंवाद - युवा विचारांचे आदान-प्रदान, स्थळ - केशव मोरे, संत नामदेव सेवाभावी संस्था, नर्सी (ना.) ता.जि. हिंगोली, 7) दिनांक 18 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 निबंध स्पर्धा, स्थळ - शंभुराजे गड, प्लॉट न. 88, महाकाली नगर, अकोला रोड, हिंगोली, 8) दिनांक 19 जानेवारी, 2018 रोजी दुपारी 2.00 युवा सप्ताह समारोप व बक्षीस वितरण, स्थळ - शिवाजी महाविद्यालय, हिंगोली याप्रमाणे सदर युवा सप्ताहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी जिल्ह्यातील शाळा / महाविद्यालयातील युवक / युवतींनी जास्तीत-जास्त संख्येने यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****
जिल्हा कृषि महोत्सवासाठी संपर्क कक्षाचे उद्घाटन संपन्न

            हिंगोली, दि. 12 : महाराष्ट्र शासनाने जिल्हानिहाय कृषि महोत्सवाचे आयोजन जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तसेच कृषि व संलग्न विभागांच्या सहभागाने रामलीला मैदानावर दि. 10 ते 14  फेब्रुवारी, 2018 या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरीता स्वतंत्र संपर्क कक्षाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सहकार व पणन सुधीर प्रभु मेत्रेवार यांचे हस्ते प्रकल्प संचालक आत्मा यांचे कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे, प्रकल्प संचालक आत्मा तथा सदस्य सचिव जिल्हा कृषि महोत्सव एम. डी. जाधव, प्रकल्प उपसंचालक आत्मा एम. डी. तिर्थकर, कृषि उपसंचालक, एस. व्ही. लाडके व कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विषयक योजनांची माहीती सामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचविणे,  शेतकरी - शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार -शेतकरी - विपणन साखळी सक्षमीकरण करण्याकरीता तसेच समुह/गटांना संघटीत करून स्थापीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता वृध्दींगत करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व ग्राहकाला उच्च दर्जाचा शेतमाल मिळण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे, कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता व खरेदीदार यांना एकत्र आणून बाजाराभिमुख कृषि उत्पादन आणि विपणनास चालऩा देणे असे विविध उद्देश ठेवून        यावेळी बोलताना जिल्हा उपनिबंधक यांनी या संधीचा फायदा जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी समुह, महिला समुह, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, विविध कृषि निविष्ठांच्या कंपन्या व डीलर्स, कृषि यांत्रिकीकरणाशी संबंधी कंपन्या, सुक्ष्म सिंचन साहीत्य पुरवठादार कंपन्या, प्रक्रिया उद्योजक, खाजगी बाजार, शासकीय व निमशासकीय कृषि संलग्न विभाग यांनी घ्यावा. यासाठीच कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार व पणन विभाग सर्व योजनांचा प्रचार व प्रसार करून संपूर्ण मनुष्यबळासह उपस्थित राहील असे सांगीतले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जीव ओतून शेतकऱ्यासाठी या महोत्सवात काम करण्याचे आवाहन केले.
             प्रकल्प संचालक आत्मा एम. डी. जाधव यांनी विविध शास्त्रज्ञांचे विविध कृषि विषयक तंत्रज्ञानावर आधारीत मार्गदर्शनाकरीता परिसंवाद सभामंडपासहीत चार भव्य प्रदर्शन दालने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्रे, विक्रेता खरेदीदार संम्मेलन, शेतकरी सन्मान समारंभ, धान्य महोत्सव या कृषि महोत्सवातील प्रमुख बाबी असतील. जिल्ह्यातील कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्था, उपक्रम यांचा यथोचीत सत्कार या महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पिकविल्या जाणाऱ्या शेतमालाची ग्राहकांना थेट विक्री करण्यासाठी स्वतंत्र दालन, विविध कृषि निविष्ठा, कृषि यांत्रिकीकरण कंपन्या, सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया उद्योजक यांना या निमित्ताने आपापल्या उत्पादनासहीत निमंत्रीत केले जाईल. यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाची एकत्रित माहिती जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मिळेल. कृषि, पणन, पशुसंवर्धन, सहकार, रेशीम उद्योग, वखार महामंडळ, मत्स्यविकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, बियाणे महामंडळ, इ. शासकीय व निमशासकीय विभाग तसेच  खाजगी बीजोत्पादन कंपन्या, खते व किड संरक्षण औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचेकडील तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार या महोत्सवाच्या माध्यमातून करणार आहे.
            जिल्हा कृषि महोत्सवात सहभाग घेवू इच्छिणाऱ्या कंपनी व शेतकऱ्यांनी नोंदणी कक्षाचे संपर्क अधिकारी गजानन कन्हेरकर (संपर्क क्र  7588434672) यांचेशी संपर्क साधावा.
*****

वृत्त क्र. 17                                                                                                        दिनांक : 12 जानेवारी 2018
एचएएम रेडिओ प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन
            हिंगोली, दि. 12 : नैसर्गिक अथवा मानव निर्मित आपत्तीमध्ये तात्काळ मदत कार्य पोचवण्यासाठी व शोध व बचाव कार्य करण्यासाठी संपर्क यंत्रणा महत्वाची व गरजेचे असते. हिंगोली जिल्ह्यात शासनामार्फत एचएएम रेडिओ (HAM RADIO) संपर्क यंत्रणा येत्या काळात कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी एचएएम रेडिओ प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
पुर, भूकंप, वादळी वारे व इतर आपत्तीमध्ये टेलिफोन, मोबाईल तसेच इंटरनेट इत्यादी संपर्क यंत्रणा प्रभावित झालेल्या असतात. मात्र यावेळी एचएएम रेडिओ (HAM RADIO), व्हीएचएफ (VHF) वायरलेस या संपर्क यंत्रणेचा वापर करून एकमेकांमध्ये समन्वय साधून आपत्तीत मदत कार्य पोचवता येते. या यंत्रणेच्या वापरासाठी आपत्ती काळात तज्ज्ञ मनुष्यबळाची जिल्हाधिकारी कार्यालयास गरज आहे.
याकरीता सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत HAM RADIO चे प्रशिक्षण, त्यानंतर केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागामार्फत HAM RADIO ची परीक्षा व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाचा HAM RADIO वापराचा परवाना देण्यात येईल. यासाठी लागणारा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाकरीता शासकीय/निमशासकीय विभागाचे अधिकारी/कर्मचारी, निवृत्त सैनिक, इतर निवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरीक इत्यादी या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करू शकतात. तरी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी दि. २० जानेवारी, २०१८ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास संपर्क साधावा. (मो. क्र.९४०५४०८९३९), असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

वृत्त क्र. 10                                                               दिनांक : 12 जानेवारी 2018
जिल्हाधिकारी कार्यालयात
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
हिंगोली, दि. 12 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिनीयार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्री. बोरगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदी उपस्थित होते. 
*****
वृत्त क्र. 11                                                              
सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन
            हिंगोली, दि. 12 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क, व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे.  त्या अंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली त्यांचे दालनात दि. 15 जानेवारी, 2018  रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही दिन होणार आहे.
त्यानुसार ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली यांचे कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
वृत्त क्र. 12                                                              
इतर मागासवर्गीय महामंडळाच्या लाभार्थ्यांनी
थकित व्याज सवलतीत भरण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 12 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचे जिल्हा कार्यालय हिंगोली यांचे मार्फत विविध कर्ज योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अप्‍ व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील थकीत वसूलीबाबत मा. सचिव विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग, कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई 400032 यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेतला असता एकूण थकीत रक्कम रु. 35.24 लक्ष इतकी असल्याने थकीत लाभार्थी त्यांचे जामीनदार हमीपत्र/पगारपत्र धारकाचे वेतनातून कपात, गहाणखत (कर्ज बोजा नोंद उतारे) इत्यादीच्या आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 मधील तरतूदीनुसार आर. आर. सी. इत्यादी अंतर्गत कार्यवाही करून वसुली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यानुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याचे कामकाज चालु झालेले आहे. त्यानुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील थकीत लाभार्थीना जाहीर आवाहन करण्यात येते की, महामंडळाकडून 31 मार्च, 2018 पर्यंत थकीत व्याज रक्कमेवर लाभार्थींना 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थीनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरणा करून कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व कायदेशीर कार्यवाही टाळावी, असे जिल्हा व्यवस्थापक अरुण एस. समुद्रे यांनी कळविले आहे.

*****

वृत्त क्र. 13                                                               दिनांक : 12 जानेवारी 2018
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले
भारत सरकार शिष्यवृत्ती संदर्भातील अर्ज सादर करण्याचे आवाहन
            हिंगोली, दि. 12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी, निवार्ह भत्ता, विद्यावितने इत्यादी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून राज्यशासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या महा-डिबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे https://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ स्थगित करण्यात आलेले होते. परंतू काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतने इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने तो अदा करण्यासाठी आता ई-स्कॉलरशिप हे संकेतस्थळ दि. 21 नोव्हेंबर, 2017 पासून पुन्हा मर्यादीत कालावधीसाठी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
            परंतू सदरचे संकेतस्थळ सुरू होऊन एक महिना झाला असून सद्यस्थितीत महाविद्यालय स्तरावर सन 2015-16 व 2016-17 मधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी, इ. योजनेचे अर्ज प्रलंबित दिसून येत आहेत. या संदर्भात महाविद्यालयास वेळोवेळी पत्राव्दारे व दूरध्वनीव्दारे सूचना देऊनही महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय गांभीर्यांने घेतला नसल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर आहे.
तरी याव्दारे पुनश्च एकदा हिंगोली जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ तसेच व्यावसायिक महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, आपल्या स्तरावर असलेले विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे सन 2015-16 व 2016-17 चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतणीकरणाचे प्रस्ताव दि. 15 जानेवारी, 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या लॉगीनवर फॉरवर्ड करुन त्याची हार्डकॉपी कार्यालयास सादर करण्यात यावी. अन्यथा प्रलंबित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा करणे ही संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जबाबदारी असेल. भविष्यात सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास यास सर्वस्वी महाविद्यालय जबाबदार राहील, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
वृत्त क्र. 14 
चित्रपट अभिनय व चित्रपट निर्मिती मार्गदर्शनपर परिसंवाद
            हिंगोली, दि. 12 : स्थानिक हिंगोली जिल्ह्यातील अभिनय करणाऱ्या युवक युवतींना सुवर्णसंधीच एक दालन मिळणार आहे. ते म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली व्दारा आयोजित चित्रपट अभिनय व चित्रपट निर्मिती मार्गदर्शन पर परिसंवाद पर 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
            सदर कार्यक्रमामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये करीअर करू इच्छिणाऱ्यासाठी कार्यशाळेचे आयोजन दि. 17 ते 29 जानेवारी, 2018 या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसिध्द अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक श्याम धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रभावी संभाषण कौशल्य, व्हाईस मॉड्युलेशन, चेहऱ्यावरील हावभाव, शॉटकट डिव्हीजन्स, गीत लिखाण, फिल्म निर्देशन, इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
            सदर कार्यक्रम हा सशुल्क असुन या कार्यक्रमाची नोंदणी करण्याची अंतिम दि. 17 जानेवारी, 2018 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक विकास उंडाळ मो. 8412089242 व कोंडेकर अरुण मो. 8698770678 यांच्याकडे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आपले नाव आरक्षित करून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, या कार्यशाळेमध्ये फक्त 30 प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ शकतील. असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****

वृत्त क्र. 15                                                               दिनांक : 12 जानेवारी 2018
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ
 अभ्यासक्रमासाठी संस्थेने अर्ज करण्याचे आवाहन
            हिंगोली, दि. 12 : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत आलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता इच्छूक संस्थांकडून / व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  अर्ज करण्याचा कालावधी दि. 15 डिसेंबर, 2017 ते दि. 16 जानेवारी, 2018 पर्यंत नियमित शुल्कासह व दि. 17 जानेवारी, 2018 ते दि. 31 जानेवारी, 2018 पर्यंत विलंब शुल्कासह आहे.
            उपरोक्त बाबत संबंधित अर्ज व माहितीपुस्तिका मंडळाचे www.msbve.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इच्छूक संस्थांनी संकेत स्थळावरून सन 2018-19 साठी प्रसिध्द केलेल्या माहितीपुस्तिकेमधुन आवश्यक परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे, चलन (अर्ज रक्कम व प्रक्रिया शुल्क रक्कमेचे) इत्यादी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, यांचेकडे वरील कालावधीत जमा करावयाचे आहे.
            अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधावा अथवा  www.msbve.gov.in मंडळाच्या या संकेतस्थळावर पहावे.

*****

09 January, 2018

गरोदर महिलांना प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ द्यावा

जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली, दि.09: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानातंर्गत शासकीय रुग्णालय, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय सर्व संस्था मध्ये गरोदर महिलांची मोफत तपासणी केली जाते. या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांर्तगत खासगी रुग्णालयांनी देखील सहभाग नोंदवून गरजूंना या अभियानाचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
            जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आयोजित प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. सतिष रुणवाल, डॉ. कुटे, डॉ. बोले, डॉ. अग्रवाल, डॉ. गुंडेवार यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, बहुतेक महिलांना योग्य पोषण आणि स्वत:च्या आरोग्याची पूर्तता करणे त्यांच्यासाठी मुश्कील असते. तसेच अनेक महिला या घरातील कामात इतक्या व्यस्त असतात कि त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. याकरीताच शासनाने गर्भवती महिलांकरीता ‘पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान’ (PMSMA) सुरु केली. या योजनेमुळे माता व शिशु मृत्यू दर कमी करता येऊ शकतो. गर्भवती महिला विशेषता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला कुपोषित असतात. त्यांना गर्भधारणे दम्यान पोषक घटक भेटत नाहीत. यामुळे बहुतेक वेळा जन्माला येणारी मुले कोणत्या ना कोणत्या आजाराची शिकार होऊनच जन्माला येतात आणि याबरोबरच कुपोषित असतात. जर गर्भवती महिलांना वेळच्यावेळी देखरेख केली तर नवजात बालकांना होणाऱ्या बऱ्याच आजारांची समस्या कमी होण्यास मदत होते. गरिबी आणि जागरूकता नसल्यामुळे बहुतेक महिला वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि घेण्यात येत असलेल्या काळजीचा फायदा घेत नाही. पीएमएसएमए मुळे प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी होत असल्याची खात्री होईल. गर्भवती महिला देशातील कोणत्याही शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेऊ शकतात. नियमित तपासणी व काळजी घेतल्यावर निश्चितपणे रोगजनक जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या कमी होईल. वैद्यकीय तपासणीनंतर आरोग्याची योग्य पाळत ठेवल्यास पोषण पूरक आहार घटक उपलब्धता खात्री होऊन माता व शिशु यांना निरोगी जीवन मिळण्यास मदत होते.
            यावेळी डॉ. रुणवाल म्हणाले की, पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानातंर्गत गर्भवती महिलांसाठी हा कार्यक्रम अशा सर्व गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवतो ज्या गर्भावस्थेच्या 2 आणि 3 ट्राइमेस्टर मध्ये आहेत. पीएमएसएमए योजनेनुसार सर्व सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रावर प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला सर्व गर्भवती महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते. सर्वसाधारणपणे जेंव्हा एखादी महिला गर्भवती राहते अशावेळेस वेगवेगळ्या आजारांनी जसे गरोदर महिलांचे वजन, उंची, हिमोग्लोबीन, रक्‍तगट, एचआयव्ही, कावीळ, शुगर आदी तपासणी करून गोळ्या-औषधे देण्यात येतात. या योजनेनुसार गर्भवती महिलांसाठी चांगले आरोग्य आणि स्वतंत्र तपासणी प्रदान करण्याबरोबरच निरोगी मुलांना जन्म देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी गर्भवती महिंलाची करण्यात येणारी तपासणीची प्रत्यक्ष पाहणी केली.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्यकीय निवासी अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशांत गिरी, प्रदिप आंधळे, शिवाजी शेळके, श्रीमती क्षीरसागर, श्रीमती गिरी यांनी सहकार्य केले.
*****