17 September, 2018


मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य
                                                                                                                                - पालकमंत्री दिलीप कांबळे




        हिंगोली,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देत मराठवाड्याला निजामांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. निजामांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी हा मुक्तीसंग्राम लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह इतर थोर नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेल्याचे ते म्हणाले.
            मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिल्याने अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखंडातून मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या  संपुर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेऊन मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषि विषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्याची आवश्यकता असल्याचे ही पालकमंत्री कांबळे यावेळी म्हणाले.
            प्रारंभी पालकमंत्री कांबळे यांनी देवडा नगर येथील उद्यानातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहन केले. यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेतली.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उप जिल्हाधिकारी निवडणूक गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपनिबंधक श्री. मैत्रवार,उपविभागीय व अधिकारी केशव वाबळे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घुबडे पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी - विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थिती होती.
****



वृत्त क्र.307                                                            दिनांक : 17 सप्टेंबर, 2018


जिल्हाधिकारी कार्यालयात अनिल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

        हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी निवडणूक गोविंद रणवीरकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

****



15 September, 2018

ई-विकास प्रणाली अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन


ई-विकास प्रणाली अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि.15: जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानात, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, शिक्षण  शुल्क, परीक्षा शुल्काचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ई-विकास प्रणाली( www.etribal.maharashtra.gov.in) दिनांक 14 मार्च ते 30 एप्रिल 2018 पर्यंत सुरु  करण्यात आली होती. परंतू काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज हे एकाच वर्षात भरल्यामुळे किंवा काही विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे उशिरा प्राप्त झाल्यामुळे ई- विकास प्रणाली दिनांक 7 ते 17 सप्टेंबर 2018 या कालावधीसाठी सुरु करण्यात येत आहे.
            ही अंतिम संधी देण्यात येत असून त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीतील पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरावेत. तसेच शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी वरीलप्रमाणे ऑनलाईन लिंक सुरु  करण्यात येईल. ई-विकास प्रणालीवर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास  etribal.support@maharashtra.gov.in  या ई-मेलवर कळवावे, सदरची प्रक्रीया वेळेत पूर्ण करण्याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे .
00000

14 September, 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2018-19 अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2018-19 अंतर्गत
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.14: जिल्हयातील अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू  शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधाअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्यापैकी इयत्ता 11 वी 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महावीद्यालयायत /शीक्षण संस्था मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहा मधील मुलां- मुलींप्रमाणे भोजन,निवास, शैक्षणीक साहीत्य,निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुवीधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. सदर योजने अंतर्गत सन 2018-19 करीता अर्ज करण्यासाठी अंतीम मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करावा राहील. सदर योजने अंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत .
योजनेचे निकष : विद्यार्थी  शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र असावा,विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवाशी असावा,शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने  प्रवेश घेतलेला असावा,विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा,विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारत असेल,या योजनेसाठी सामाजिक न्यायविभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व व नवबौध्द वीद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल,विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेडयूल्ड बँके खाते उघडले आहे . त्या खात्याशी संलग्न करणे  बंधनकारक असेल,सदर योजनेला लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे,विद्यार्थी स्थानीक रहीवाशी नसावा. (ज्या महाविद्यालय /शैक्षणीक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे. तो विद्यार्थी ते महावीद्यालय / शैक्षणीक संस्था ज्या महानगर पालिक / ग्रामपंचायत यांच्या हददीत आहे त्या महानगर पालिका / ग्रामपंचायत येथील रहीवाशी नसावा.),महानगर पालीकेच्या हद्रदी पासून 5 कि.मी. परीसरात असलेल्या महाविद्यालय/शीक्षण संस्थेत शीकत असलेले वीद्यार्थी सुध्दा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील,विद्यार्थी 11 वी ,12 वी आणि त्यानंतरचे उच्च शीक्षण घेणारा असावा,12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी /पदव्युत्तर शीक्षणासाठी लाभ घेता येईल,या योजनेचा पुढे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमाचे मागील प्रत्येक शैक्षणीक वर्षात्‍ कीमान 5‍0 % गुण कींवा त्याप्रमाणात ग्रेडेशन /CGPA असणे आवश्यक राहील,विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी नसावा,विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल, या योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील)विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. त्यांना गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील,या योजनेसाठी खासबाब सवलत लागू राहणार नाही.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (साक्षांकीत प्रती)
             जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहीवाशी असल्याचा पुरावा,आधार कार्डाची प्रत, बँक पासबूक झेरॉक्स,उत्पनाचे प्रमाणपत्र / फॉर्म नंबर 16,विद्यार्थी दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी, 12 वी, व पदवी परिक्षेचे गुणपत्रक, महावीद्यालयाचे बोनाफाईट सर्टिफीकेट,विद्यार्थीनीने विवाहीत असल्यास पतीचा उत्पन्नाचा पुरावा,बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा,विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, स्थानीक रहीवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र,विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा.(खाजगी वसतीगृह, भाडे करारनामा इ.),महावीद्यालयाचे उपस्थीती प्रमाणपत्र, सत्र परीक्षेच्या नीकालाची प्रत.
           या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्याजिल्हयामध्ये शीकत आहे त्या जील्हयाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  यांचेकडे त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, विद्यार्थ्यांची महावीद्यालयातील उपस्थीती कीमान 75 टक्के आवश्यक राहील. याबाबत संबधीत संस्थेचे प्रत्येक सहामाही उपस्थीती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील,विद्यार्थ्यांने खोटी माहीती अथवा कागदपत्रे देवून लाभ घेण्याचा प्रयन्त केल्यास कींवा  शैक्षणीक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यावसाय करत असल्यास आणि  इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैरवापर गेल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसूली केली जाईल, असे भाऊराव चव्हाण,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांनी केले आहे.
00000

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
        हिंगोली,दि.14: जिल्ह्यात  दिनांक 13 ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 11 ते  20 सप्टेंबर 2018 पर्यंत मोहरम हा सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 15 ते 17 सप्टेंबर 2018 पर्यंत ज्येष्ठा गौरीपूजन करण्यात येते.  दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येणार आहे.  तसेच दिनांक 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी / गणपती विसर्जन  होणार आहे.
            तसेच विविध  समाजातर्फे आरक्षण मिळावे  या मागणी संबंधाने हिंगोली जिल्ह्यात  विविध प्रकारचे मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे सुरु असून अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही . असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 16 सप्टेंबर 2018 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 30 सप्टेंबर 2018 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000