08 April, 2019

मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करा निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर





मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करा
निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर

हिंगोली,दि.08: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ निवडणूक मतदान दूसऱ्या टप्प्यात होणार आहे. मतदारांकरीता मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहे. परंतू अजूनही मतदार संघातील काही मतदान केंद्रावर मतदारांकरीता मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असून, सदर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश निवडणूक निरिक्षक (सामान्य) डॉ. जे. रवीशंकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह नोडल अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी श्री. रवीशंकर म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीताची निवडणूक मतदान दूसऱ्या टप्प्यात    दि. 18 एप्रिल, 2019 रोजी होणार असून, हिंगोली  लोकसभा मतदार संघात एकुण 1 हजार 990 मतदान केंद्र आहेत. काही मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, स्वच्छता गृह, पुरेशी प्रकाश व्यवस्था अशा प्रकारच्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. यात जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प, व्हिल चेअर, मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारासाठी बसण्यासाठी खुर्च्या/बेंच, पिण्याचे पाणी, योग्य प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष, प्रसाधनगृह, उन्हापासून संरक्षणासाठी शेड आदींचा समावेश आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर या सोयी सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले असून, येत्या 03 दिवसात सर्व मतदान केंद्रावर या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेला यावेळी निवडणूक निरिक्षक (सामान्य) डॉ. जे. रवीशंकर यांनी दिले. 
सद्या उन्हाळा सुरु असल्याने तापमानात तीव्रतेन वाढ होत आहे. मतदारांना उष्माघाताचा धोका होवू नये याकरीता आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रावर उपचारांची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी यावेळी दिल्या.

 

****


त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याचे आवाहन



त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.8: माहे एप्रिल 2019 चे मासिक वेतन देयक दाखल करताना सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी  आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे माहे मार्च 2019 अखेरचे ई-आर 1 त्रैमासिक विवरणपत्र माहे 30 एप्रिल 2019 पर्यंत भरावयाची मुदत असून www.mahaswayam.gov.in   या संकेत स्थळ वरुन ऑनलाईन ई आर 1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय, मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्विकारले जाणार नाहीत. सर्व कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर आय.डी. व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल  आयडी, फोन नंबर, पत्ता, टॅन नंबर, पॅन नंबर टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी कळविले आहे.
00000


05 April, 2019

मतदानाकरिता कामगारांना सुट्टी किंवा भरपगारी सुट्टी


मतदानाकरिता कामगारांना सुट्टी किंवा भरपगारी सुट्टी
       हिंगोली,दि.5: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 च्या अनुषंगाने  15-हिंगोली लोकसभा मतदार संघा करीता दूसऱ्या टप्प्यात गुरुवार दि. 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांनी दि. गुरुवार दि. 18 एप्रिल, 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याचे यापूर्वीच कळविले आहे.
तसेच या निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी निवडणुक क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, व्यापार, औद्योगिक उपक्रम व इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे शासन परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****




सोशल माध्यमावर विना परवानगी प्रचार करणाऱ्या उमेदवारांना नोटीस


सोशल माध्यमावर विना परवानगी प्रचार करणाऱ्या उमेदवारांना नोटीस

            हिंगोली,दि.5: आगामी लोकसभा निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली असून, या निवडणूकीत राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून प्रचार-प्रसिध्दीसाठी माध्यमाचा गैरवापर होवू नये याकरीता जिल्‍हा माध्‍यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या जिल्‍हा माध्‍यम प्रमाणन व संनियंत्रण समितीमार्फत हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता निवडणूकीत भाग घेतलेल्या राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या दैनंदिन प्रसिध्द होणाऱ्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील संशयीत पेड न्यूज आणि जाहिरातीवर लक्ष ठेवण्‍यात येत आहे. मतदार संघातील काही उमेदवारांनी समितीकडून प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती/मजकूर समाज (सोशल मिडिया) माध्यमाद्वारे प्रसिध्द केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन संनियंत्रण समितीने चार उमेदवारांना नोटीस देण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षेत संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन संनियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उमरखेड आणि किनवट यांचे प्रतिनिधी, समिती सदस्य डॉ. विजयकुमार कानवटे, आकाशवाणी कार्यक्रम प्रमुख सतीष जोशी, सोशल मिडिया तज्ज्ञ रोहित कनसे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मिडियावर जाहिरात किंवा इतर  मजकुर प्रसारित करण्यापूर्वी जिल्‍हा माध्‍यम प्रमाणन व संनियंत्रण समितीमार्फत  सदर जाहिरात/मजकुर प्रमाणित करुन घेण्याचे मा. निवडणूक आयोगाचे निर्देश आहे.  परंतू काही उमेदवारांनी किंवा त्यांच्या सोशल मिडियातील मित्रांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन संनियंत्रण कक्षामार्फत प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती/मजकुर (व्हिडिओ) या सोशल मिडियावर प्रसारित केल्याचे सोशल मिडिया तज्ज्ञ यांच्या निदर्शनास आल्याने याबाबतचा अहवाल समिती पूढे सादर करण्यात आला. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुभाष वानखेडे, शिवसेना पक्षाचे हेमंत पाटील,  बहूजन मुक्ती पार्टीच्या वर्षा देवसरकर आणि वंचीत बहूजन आघाडी पक्षाचे मोहन राठोड या चार उमेदवारांच्या जाहिराती/मजकूर (व्हिडिओ) हे माध्यम प्रमाणन सनियंत्रण समिती यांच्यामार्फत प्रमाणित करुन न घेता सदर उमेदवार किंवा त्यांचे सोशल मिडियातील मित्र यांच्या मार्फत समाज माध्यमात प्रसारित करण्यात आल्याचे समितीच्या निदर्शनास आले. याकरीता समितीने संबंधीत उमेदवारांना सदर जाहिरात/मजकूर हा माध्यम, प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन न घेता का प्रसिध्द केला ? तसेच या जाहिरातीचा खर्च आपल्या खर्चात का समाविष्ट करण्यात येऊ नये, याकरीता नोटीस बजावून त्यांच्या खुलासा मागविला आला आहे.
उमेदवारांचे फेसबुक, व्टिटर, इन्‍स्‍टाग्राम, युट्युब, व्‍हॉट्स अॅप या समाज माध्‍यमातून आक्षेपार्ह मजकूर अथवा व्हिडीओ/ ऑडिओ क्लिप मजकूर यासंदर्भात समितीने लक्ष ठेवून अहवाल सादर करावा तसेच विना परवानगी प्रचार करणाऱ्यावर कारवाई करावी. तसेच नागरिकांना कोणत्याही समाज माध्यमात निवडणूक विषयक आक्षेपार्ह जाहिरात/मजकूर निदर्शनास आल्यास, नागरिकांनी जिल्हा प्रशासनास किंवा 1950 या टोल फ्रि क्रमांकावर कळवावे असे आवाहन ही जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी यावेळी केले.
****

02 April, 2019


निवडणूक प्रचारासाठी सोशल मिडियाचा

गैरवापर करणाऱ्यावर होणार कारवाई

-        जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

 

            हिंगोली,दि.2: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता निवडणूकीत भाग घेतलेल्या उमेदवार राजकीय पक्षांच्या पेड न्युजवर चोख लक्ष ठेवून दैनंदिन प्रसिध्द होणाऱ्या मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील संशयीत पेड न्यूज किंवा इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमातील प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती प्रसिध्दी झाल्याचे निदर्शानास आल्यास कार्यवाही करून संबंधीतास नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.
     मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचार सहिंतेचा भंग होवू नये, यासाठी माध्यम प्रमाणन सनियंत्रण समिती (मिडीया सर्टिफिकेशन ॲन्ड मॉनीटरींग कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि समाज (सोशल मिडिया) माध्यमाचा प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या गैरवापरावर आणि पेड न्यूजवर हि समिती लक्ष्य ठेवणार आहे. याकरीता लोकसभा निवडणूक कालावधीत समितीचे सदस्य असलेले मतदार संघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सदस्य यांची वेळोवेळी बैठक बोलवून मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमातील प्रसिध्द होणाऱ्या वृत्त आणि जाहिरातींबाबत वेळोवळी आढावा घेवून आचार संहितेचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जयवंशी यांनी दिल्या आहे.
    निवडणूकीतील सर्व उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमात (सोशल मिडिया) सर्व प्रकारच्या जाहिराती प्रसिध्दी करण्यापूर्वी सदर जाहिराती माध्यम प्रमाणन सनियंत्रण समिती (मिडीया सर्टिफिकेशन ॲन्ड मॉनीटरींग कमिटी) यांच्यामार्फत प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच प्रमाणीत न करता प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीबाबत संबंधीतावर कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्‍ह्यात वर्तमान पत्रामध्‍ये प्रसिध्द होणाऱ्या बातम्‍या, लेख तसेच समाज माध्‍यमांतील व्‍हॉट्स अॅप ग्रुपवरील विनापरवानगी पोस्‍ट, मोबाईलद्वारे बल्क एस.एम.एस. अथवा प्रचार करणाऱ्या तसेच सेवा पुरवणाऱ्या संस्थावर कारवाई करण्‍याच्‍या सुचना ही जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिल्या.
****

01 April, 2019

मतदानाकरीता 18 एप्रिल रोजी सार्वजनीक सुट्टी


मतदानाकरीता 18 एप्रिल रोजी सार्वजनीक सुट्टी

        हिंगोली,दि.1: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 च्या अनुषंगाने  15-हिंगोली लोकसभा मतदार संघा करीता दूसऱ्या टप्प्यात गुरुवार दि. 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांनी दि. गुरुवार दि. 18 एप्रिल, 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आले असल्याचे कळविले आहे.

****


जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मी मतदान करणारच’ स्वाक्षरी मोहीम





जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मी मतदान करणारच’ स्वाक्षरी मोहीम

        हिंगोली,दि.1: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता 15-हिंगोली मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून, दूसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीत मतदानाला अत्यंत महत्व असून, प्रत्येक पात्र नागरिकांनी आपला मतदान हक्क बजावलाच पाहिजे. याकरीता हिंगोली जिल्ह्यात मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृतीसाठी `सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप) मोहीम राबविली जात आहे. नव मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगुन मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी स्वीप महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
नागरिकांना मतदान करण्याची जबाबदारी कळावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ‘मी मतदान करणारच…! इतराना ही सांगणार’ असे घोषवाक्य असलेला फलक लावून त्यावर स्वाक्षरी मोहीम घेतली जाणार आहे. या अनुषंगानेच आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाक्षरी मेाहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी,  अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक संचालक रेणुका तम्मलवार, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, नायब तहसीलदार राजेंद्र गळगे आदींची उपस्थिती होती.
हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता नियुक्त करण्यात आलेल्या स्वीप समितीने मतदार जनजागृतीचा आराखडा तयार केला असून, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार संघात विविध स्पर्धा, उपक्रम, कलापथक, प्रसिद्धी माध्यमे या माध्यमातून जनजागृती करून मतदारांना  मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे.

****