15 June, 2020

फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद


 फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद

        हिंगोली,दि.15 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले लॉकडाऊन आणि खरिप हंगाम सुरु झाल्याने शेती विषयक नागरिक व शेतकरी यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनेतेशी संवाद साधणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे जिल्ह्यात कोरोनाच्या परिस्थितीची सद्यस्थिती, तसेच खरिप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना शेती विषयक असलेले प्रश्न आणि रोजगार हमी योजना या विषयावर संवाद साधणार आहेत. जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली’ या फेसबूक पेजच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी मंगळवार, दि. 16 जून, 2020 रोजी दूपारी 12 वाजता संवाद साधता येणार आहे.
याबरोबरच संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली’ या फेसबूक पेजच्या कंमेन्ट बॉक्स माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी, उपयुक्त सूचना, प्रश्न जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना विचारता येणार असुन जिल्हाधिकारी या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना किंवा प्रश्न पाठवतांना आपले ठिकाण व तालूका आवर्जून नमूद करावा. हिंगोलीकरांनी या फेसबूक लाईव्ह संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी  व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
*****


हिंगोलीत 03 नवीन रुग्ण; तर 42 बाधित रुग्णांवर उपचार सुरु


हिंगोलीत 03 नवीन रुग्ण; तर 42 बाधित रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली, दि.15:  जिल्ह्यात कोरोना बाधीत 03 नवीन रुग्ण आढळले असून, सद्यस्थितीत 42 बाधीत रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यामध्ये सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटर येथे भगवती गावात मुंबई येथून सेनगाव तालुक्यात आलेल्या  03 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना भरती करण्यात आले आहे. तसेच हिंगोली जिल्ह्याअंतर्गत कोविड-19 ची लागण झालेले व उपचारासाठी वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये 02 बाधीत रुग्णांना (कुरेशी मोहल्ला-1, अशोक नगर-1 येथील रहिवासी) उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तर कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये  05 बाधीत रुग्णांना (जाम-01, दाती-03, डोंगरकडा-01 येथील रहिवासी) उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कळमनुरी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये (एस.आर.पी.एफ. जवान)  उपचारासाठी भरती असलेल्या कोविड-19 बाधीत रुग्णास  विशेष काळजी म्हणून त्यास औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटल मध्ये भरती करण्यात आले आहे.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये कोविड-19 चे चोंढी खुर्द-05, सेनगाव-03, रिसाला बाजार-02, नगर परिषद कॉलनी-04, कलगाव-06, सिरसम बुद्रुक-01, ब्राह्मणवाडा-01, सुकळी वळण-01, खानापूर-01,पेन्शनपुरा-04, भोईपुरा-01, कमला नगर-01, सम्राट नगर, वसमत-01 असे एकूण एकूण 31 जणांना कोविड-19 ची लागण झाली असून ते उपचारासाठी भरती आहेत.
आतापर्यत जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड व सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 2 हजार 847 व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 347 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यापैकी 2 हजार 307 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. तसेच सद्य:स्थितीत 514 व्यक्ती भरती असून, आज रोजीपर्यंत 110 जणांचा अहवाल येणे प्रलंबित आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 228 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 186 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत 42 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

11 June, 2020

हिंगोली तालुक्यातील कलगांव व सिरसम आणि वसमत नगरपरिषदेतील प्रभाग क्र.03 कंटेनमेंट झोन घोषीत



        हिंगोली,दि.11: हिंगोली तालुक्यातील कलगांव आणि सिरसम तसेच  वसमत तालुक्यातील नगर परिषद प्रभाग क्र.3  कुरेशी मोहल्ला येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून कलगांव आणि सिरसम या गावाचे संपूर्ण क्षेत्र तसेच वसमत नगरपरिषदेतील प्रभाग क्र. 3, कुरेशी मोहल्ला  कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****



10 June, 2020

फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी साधणार जनतेशी संवाद



        हिंगोली,दि.10 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले लॉकडाऊन आणि खरिप हंगाम सुरु झाल्याने शेती विषयक नागरिक व शेतकरी यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनेतेशी संवाद साधणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे जिल्ह्यात कोरोनाच्या परिस्थितीची सद्यस्थिती, तसेच खरिप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना शेती विषयक असलेले प्रश्न आणि रोजगार हमी योजना या विषयावर संवाद साधणार आहेत. जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली’ या फेसबूक पेजच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी मंगळवार, दि. 16 जून, 2020 रोजी दूपारी 12 वाजता संवाद साधता येणार आहे.
याबरोबरच संवाद कार्यक्रमाच्या दरम्यान ‘जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली’ या फेसबूक पेजच्या कंमेन्ट बॉक्स माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी, उपयुक्त सूचना, प्रश्न जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना विचारता येणार असुन जिल्हाधिकारी या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना किंवा प्रश्न पाठवतांना आपले ठिकाण व तालूका आवर्जून नमूद करावा. हिंगोलीकरांनी या फेसबूक लाईव्ह संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी  व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
*****


परराज्यात, राज्यात किंवा जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक · आवेदनासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक


परराज्यात, राज्यात किंवा जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक
·   आवेदनासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक

        हिंगोली, दि.10: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजाराचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी परराज्यात, राज्यात व जिल्ह्यात अत्यावश्यक व वैद्यकीय कारणासाठी, अडकून पडलेल्या व्यक्ती, मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाद्वारे ई-पासची सुविधा सुरु करण्यात आली होती. परंतू दि. 5 जून  रोजीच्या आदेशान्वये ई-पास शिवाय प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. परंतू आत हे आदेश रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.
त्यामुळे नागरिकांना जिल्ह्यात, राज्यात किंवा परराज्यात अत्यावश्यक व वैद्यकीय कारणासाठी अडकून पडलेल्या व्यक्ती, मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी ई-पासद्वारे परवानगी घेवूनच प्रवास करावा लागणार आहे. याकरीता पुढील अटी व शर्तीनुसार परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये  प्रवास करतांना दोनचाकी वाहन केवळ 1 व्यक्तीसाठी, तीन चाकी वाहन 1+2 व्यक्तींसाठी व चारचाकी वाहन 1+2 व्यक्तींसाठी (चालक+2) यानुसार परवानगी देण्यात येणार आहे. प्रवास करणारे सर्व प्रवासी तसेच वाहन चालकांना नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवेदनासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांमध्ये व इतर ठिकाणी असतांना संबंधिताने शासनाच्या आदेशानुसार सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असणार आहे.
या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या संबंधीतास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी कळविले आहे.
****


महिला लोकशाही दिनाचे 15 जून रोजी आयोजन


महिला लोकशाही दिनाचे 15 जून  रोजी आयोजन

        हिंगोली, दि.10: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडित महिलांना  सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी  यासाठी  एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 15 जून 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही  दिन होणार आहे.
ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालयात  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000



08 June, 2020

कळमनुरी तालुक्यातील जांब गाव कंटेनमेंट झोन घोषित


कळमनुरी तालुक्यातील जांब गाव कंटेनमेंट झोन घोषित

        हिंगोली,दि.8: कळमनुरी तालुक्यातील जांब या गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून जांब या गावाचे संपूर्ण क्षेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत.  नागरिकांना आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****