23 July, 2020

कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 12 रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू · 120 रुग्णांवर उपचार सुरु

कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 12 रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू

·   120 रुग्णांवर उपचार सुरु

 

        हिंगोली, दि.23: जिल्ह्यात 12 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.

            यामध्ये श्रीनगर हिंगोली येथील 2 व्यक्ती, रिसाला बाजार हिंगोली येथील 2 व्यक्ती, गायत्री नगर हिंगोली येथील 1 व्यक्ती, मस्तानशहा नगर हिंगोली येथील 1 व्यक्ती, तालाबकट्टा हिंगोली येथील 1 व्यक्ती, पारडी ता. वसमत येथील 2 व्यक्ती, शिवाजी नगर वसमत येथील 2 व्यक्ती आणि कनेरगाव वसमत येथील 1 व्यक्ती असे एकुण 12 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

            तर हिंगोली येथील आझम कॉलनी 1 आणि मंगळवारा 1 असे 2 रुग्णांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे.

तसेच कोरोना केअर सेंटर, वसमत अंतर्गत एकूण 1 कोविड-19 रुग्ण आणि जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील 3 कोविड-19 रुग्ण असे एकूण 4 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 8 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 452 रुग्ण झाले असून त्यापैकी 327 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 120 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 5 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

 

****


मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध

मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध

       

        हिंगोली,दि.23:  महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख)  व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि. 20 जुलै ते 5 ऑगस्ट 2020 पर्यंत  पोलीस कर्मचाऱ्यांना  वार्षिक गोळीबारीचा  सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटी वर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये. अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .

****


22 July, 2020

कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 7 रुग्ण तर 2 मृत्यू · 114 रुग्णांवर उपचार सुरु

कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 7 रुग्ण तर 2 मृत्यू

·   114 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, दि.22: जिल्ह्यात 7 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.

            यामध्ये पंचशील नगर, वसमत येथील 1 व्यक्ती, आझम कॉलनी, हिंगोली येथील 1 व्यक्ती, मंगळवारा, हिंगोली येथील 1 व्यक्ती, शिरळी ता. वसमत येथील 1 व्यक्ती, पळसगाव वसमत 1 व्यक्ती, सेनगाव येथील 1 व्यक्ती तर तोफखाना, हिंगोली येथील 1 व्यक्ती असे एकुण 7 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

तसेच कोरोना केअर सेंटर, कळमनुरी अंतर्गत एकूण 4 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 7 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 2 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यान त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले असून एकूण 9 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 440 रुग्ण झाले असून त्यापैकी 323 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 114 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 3 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

 

****

 

 


21 July, 2020

कोरोना : नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी · नागरिकांची अँटीजेन टेस्टद्वारे होणार तपासणी

कोरोना : नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी   

- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

·   नागरिकांची अँटीजेन टेस्टद्वारे होणार तपासणी

 

हिंगोली,दि.21: मागील तीन ते चार दिवसात जिल्ह्यात कोवीड-19 ने बाधीत झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना आता जास्त सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

आरोग्याच्या बाबतीत कुणालाही सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास इतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास नागरिकांनी घरच्या-घरी उपचार न करता तात्काळ नजीकच्या रुग्णालयात जावून आपली तपासणी करुन उपचार घ्यावेत. कारण सद्यस्थितीत सर्वत्र कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. याकरीता नागरिकांनी आपली तसेच आपल्या कुंटूंबाची आणि पर्यायाने समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याची आता खरी गरज आहे. जिल्हा प्रशासनाने अँटीजेन टेस्टचे नियोजन केले असून आता जिल्ह्यातील नागरिकांची याद्वारे तपासणी होणार आहे. या टेस्टद्वारे बाधीत निघणारे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तात्काळ उपचार देण्यास प्रशासनास मदत होणार आहे. ज्या नागरिकांना आरोग्य संबंधी काही त्रास जाणवत असल्यास नागरिकांनी तात्काळ अँटीजेन टेस्टद्वारे आपली आरोग्याची तपासणी करुन घ्यावी. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी आपल्या आरोग्य संबंधीची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्यास तसेच घराबाहेर पडतांना मास्कचा वापर न केल्यास संबंधीता विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

कोरानामुळे मृत्यू झालेल्यांपैकी एक रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी असल्याने कोरोनाचा संसर्ग हा ग्रामीण भागापर्यंत पोहचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरील जिल्ह्यात किंवा गावात जाण्याचे टाळावे. तसेच कोणत्याही नातेवाईकांच्या घरी जावू नये किंवा कुणास आपल्या घरी येवू देवू नये. याबरोबरच लग्न संभारंभात किंवा इतर कार्यक्रमात देखील सहभागी होवू नये. कारण यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वत:हून क्वारंटाईन व्हावे. जिल्ह्यात संचारबंदी शिथील केल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करत नाही. तसेच बाजार आणि भाजीमंडीमध्ये सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी न घेतल्यास येणाऱ्या कालावधीत कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या नियमाचे पालन करुन आपले, आपल्या कुंटूंबाचे आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****


कोरोनावर नियंत्रणासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची-पालकमंत्री वषार्ताई गायकवाड

कोरोनावर नियंत्रणासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची-पालकमंत्री वषार्ताई गायकवाड

 

हिंगोली,दि.21 : कोरोनाशी लढा देताना शासकीय यंत्रणा कठोर मेहनत घेत आहेत. मात्र तरीही आता रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. या परिस्थितीत नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे अतिशय गरजेचे आहे. शासकीय यंत्रणांच्या सूचनांचा आदर करून जनतेने स्वत: व कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.       

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर वळणावर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे. मुळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेरच पडू नका. सर्वांनी एकत्रित व प्रामाणिक प्रयत्न केले तर कोरोना आटोक्यात येवू शकतो. हिंगोलीत अजूनही परिस्थिती चांगली आहे. मात्र ती हाताबाहेर न जाण्यासाठी शासन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परजिल्ह्यातून येणाºया प्रत्येकाने शासकीय क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. शिवाय कोरोनासदृश्य लक्षणे दिसून येत असल्यास तातडीने नजीकच्या शासकीय संस्थेत दाखल व्हा. आरोग्य यंत्रणा आपल्या सोयीसाठी तत्पर असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.  या आजाराची लागण एका व्यक्तीला झाल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होऊ शकते त्यामुळे आपले कुटुंब, परिसर, शहर-गाव सुरक्षित ठेवणे हीसुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे. वेळीच गांभीर्य ओळखा. कुणीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका. कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाने विविध हेल्पलाईन नंबर प्रसारित केले आहेत त्यावर संपर्क करा. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्ह्यात विविध पथक नियुक्त करण्यात आले असून अडचण आल्यास त्यांच्याशी  संपर्क साधा. आपणही दक्षता घ्या, इतरांनाही सुरक्षित करा, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री वषार्ताई गायकवाड यांनी केले आहे.

******

 


जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण · जिल्ह्यात 113 रुग्णांवर उपचार सुरु; तर 1 मृत्यू

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण

·   जिल्ह्यात 113 रुग्णांवर उपचार सुरु; तर 1 मृत्यू

 

 

हिंगोली, दि.21: जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्याकडून आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरी श्रीवास यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.

यामध्ये भाजीमंडी, कळमनुरी येथील 6 व्यक्ती, अशोक नगर, वसमत येथील 2 व्यक्ती, शुक्रवार पेठ, वसमत 1 व्यक्ती, आझम कॉलनी, हिंगोली येथील 1 व्यक्ती, विठ्ठल कॉलनी, श्रीनगर, हिंगोली येथील 1 व्यक्ती, कासारवाडा, हिंगोली येथील 1 व्यक्ती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली येथील 5 व्यक्ती तर तालाबकट्टा, हिंगोली येथील 5 व्यक्ती असे एकुण 22 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

तसेच कोरोना केअर सेंटर, वसमत अंतर्गत एकूण 9 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 10 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.  तर जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 433 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 319 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 113 रुग्णांवर उपचार चालू आहेत. कोवीड-19 मुळे 1 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

 

.****

 


20 July, 2020

हिंगोली, कळमनुरी शहरातील काही भाग तसेच मौ. रेडगांव कंटेनमेंट झोन घोषित · कळमनुरी तालुक्यातील मौ. चिखली (नवी) आणि मौ. डिग्रस वंजारी प्रतिबंध मुक्त

हिंगोली, कळमनुरी शहरातील काही भाग तसेच मौ. रेडगांव कंटेनमेंट झोन घोषित

·   कळमनुरी तालुक्यातील मौ. चिखली (नवी) आणि मौ. डिग्रस वंजारी प्रतिबंध मुक्त

 

          हिंगोली,दि.20: हिंगोली शहरातील नारायण नगर येथील डॉ. भाकरे यांच्या घराच्या आजू बाजूच्या 500 मिटर पर्यंतचा परिसर क्र. 2 चिराऊ दवाखाना ते बांगर दवाखाना, जिल्हा परिषद रोड, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय कंपाऊंड पर्यंत, पलटन गल्ली क्र. 4 डॉ. जफर यांच्या घराच्या आजू बाजूच्या 500 मिटर पर्यंत क्र. 2 शाहाने यांच्या घरापासून पोलीस अधीक्षक यांच्या घरापर्यंत,  रिहाना सागर सय्यद यांच्या घराच्या आजु बाजुचा 500 मिटर चा परिसर, रिसाला झोपडपट्टी गल्ली ते आधार दवाखान्यापर्यंतचे क्षेत्र तर कळमनुरी शहरातील भाजी मंडी ते जुना पोलीस स्टेशन व भाजी मंडी ते अलीम कादरी यांच्या घरापर्यंतचा भाग तसेच कळमनुरी तालुक्यातील मौ. रेडगांव याठिकाणी कोविड-19 चा रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी वरील सर्व भाग/गावचे संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या  सेवा नगर परिषद मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

 कळमनुरी तालुक्यातील मौ. चिखली (नवी) व मौ. डिग्रस वंजारी ही गावे प्रतिबंध मुक्त

            कळमनुरी तालुक्यातील मौ. चिखली (नवी) व मौ. डिग्रस वंजारी ही गावे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. त्याचा कालावधी संपुष्टात आल्याने ही गावे प्रतिबंध मुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****