हिंगोली
दि. 11: राज्याच्या शालेय शिक्षण
मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड या हिंगोली दौ-यावर
आल्या असून आज त्यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील चोंडी शहापूर येथील शेतकरी सखाराम
विठ्ठलराव बुचके यांच्या शेतात जाऊन त्यांनी
पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकरी श्री. बुचके यांनी
पालकमंत्री यांच्यासमोर शेतातील सोयाबीनचे उगवण नाही अशी आपली व्यथा मांडली.

यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत खासदार राजीव सातव,
आमदार राजू नवघरे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा
बिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास
अधिकारी जगदीश साहू यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment