25 October, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूक निकालाच्या अंदाजावर बंदी
हिंगोली (जिमाका), दि.25 : भारत निवडणूक आयोगाने दि. 13 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7 वाजता पासून ते दि. 20 नोव्हेंबर, 2024 च्या सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने निवडणूक निकालाचे अंदाज (EXIT POLL) प्रसार माध्यमावर प्रसारित करण्यास प्रतिबंधित घातल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
मुद्रित माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी प्रसार माध्यमांनी यांची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment