01 July, 2025

हिंगोली जिल्हा परिषद बहुविध प्रशाळेतील कायदेविषयक शिबीरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि.01: तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषद बहुविध प्रशाळेत सोमवारी (दि.30) अंमली पदार्थ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी या विषयावर कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश बांगर यांनी नियमित व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते व मानसिक तणाव येत नाही तसेच अमली पदार्थ सेवन न करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा वकील संघाचे सदस्य अॅड. अनिकेत कोकरे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी व त्याबाबत मुलींनी घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन केले. कार्यकमास अध्यक्ष म्हणून लाभलेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा तालुका विधी सेवा समितीचे समन्वयक वि.म. मानखैर यांनी विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी मेहनत करावी व चांगले ध्येय समोर ठेवावे व यशस्वी व्हावे, असे आवाहन केले. अमली पदार्थ सेवन केल्यास मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर उदाहरणे देवून विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवन न करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य एस. के. शिरसाठ, जिल्हा परिषद बहुविध प्रशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा सोनुने हे उपस्थित होत्या. कार्यकमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन जिल्हा परिषद बहुविध प्रशाळेचे शिक्षक शिवलींग साखरकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अनिस शहा यांनी केले. कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी अतुल चाटे, शितल मुंढे, शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: