12 January, 2026
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम रथमार्गाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आज घेणार आढावा
हिंगोली (जिमाका), दि 12: नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रथमार्गाच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उद्या मंगळवार, (दि.13) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेणार आहेत.
या बैठकीला जिल्हा प्रशासनातील संबंधित विभागाचे अधिकारी नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य सतवनसिंग चव्हाण, श्रीरंग राठोड, हरनाम सिंह चव्हाण, ॲड. संतोष राठोड, अर्चना राठोड, भोलासिंह दरोगा, कृष्णा जाधव, अर्जुन राठोड, लालचंद नेनवाणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नऊ समुदायातील संत महंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. शिक्षण विभागाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करावे तसेच या कार्यक्रमाची व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी जनतेमध्ये प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सिख - सिकलिगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाज या सर्व नऊ समाजातील भाविकांना नांदेड येथे पोहोचणे, जेवण, राहण्याची व्यवस्था, जाण्या-येण्याचे नियोजन तसेच प्रचार व प्रसिद्धी या सर्व बाबींमध्ये योग्य समन्वय ठेवून सामूहिक जबाबदारी पार पाडावी लागणार असल्याने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सर्व नऊ समुदायातील मान्यवरांकडून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून शिक्षण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रसार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यामध्ये स्टीकर, प्रभात फेरी, शाळांमध्ये सतींदर सिंह यांचा व्हिडीओ दाखविणे तसेच श्री गुरु तेग बहादूर साहीबजी यांच्या शहीदी समागमाविषयी विविध स्पर्धांचे आयोजन करून व्हिडीओ व छायाचित्रांच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment