30 September, 2019

नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून सांगा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन


नागरिकांना मतदानाचे
महत्व पटवून सांगा

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन



हिंगोली,दि.30: निर्भय आणि मुक्तपणे मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करा. मतदानाचे महत्व समजावून सांगा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे केले.
जिल्हा स्वीप समितीच्या वतीने जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची मतदार जागृती बाबत कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक आणि प्राचार्यांना वरीलप्रमाणे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. प्रवीणकुमार घुले, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीपच्या समन्वय अधिकारी रेणुका तम्मलवार, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेष फडसे आदि उपस्थित होते. कार्यशाळेत सुमारे बाराशे प्राचार्य, शिक्षक सहभागी झाले होते.
श्री. जयवंशी यांनी सांगितले की, प्रत्येक मत महत्वाचे आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना मतदानाचा पवित्र असा अधिकार दिला आहे. हा अधिकार बजावून प्रत्येक नागरिकांने लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे.
शिक्षक आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांकडून पालकांचे संकल्पपत्र लिहून घ्यावे. या संकल्पपत्राव्दारे प्रत्येक विद्यार्थ्यांच्याव्दारे पालकांमध्ये जनजागृती होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी मतदार जनजागृतीच्या कार्यक्रमात पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. जयवंशी यांनी केले.
यावेळी नवमतदार, महिला आणि दिव्यांग मतदारांचे मतदान वाढावे यावर भर दिला आहे. दिव्यांग व्यक्तींना मतदान करणे सोयिस्कर व्हावे यासाठी प्रशासन मदत करेल, असेही श्री. जयवंशी यांनी सांगितले.
स्वीप समितीच्या सदस्य सचिव रेणुका तम्मलवार यांनी सांगितले की मतदान प्रक्रियेत शिक्षक आणि प्राचार्यांनी पुढाकार घेऊन काम करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
कार्यशाळेचे नियोजन माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे, डायटचे अधिव्याख्याता गणेश शिंदे यांनी केले.

*****

पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणी करा : जिल्हाधिकारी


पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणी करा : जिल्हाधिकारी

हिंगोली,दि.30: औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जात असून पदवीधरांनी आपली नाव नोंदणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे केले.
भारत निवडणूक आयोगाने एक नोव्हेंबर, 2019 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पदवीधरांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आज येथे सांगितले.
नमुना अठरा क्रमांकाच्या अर्जात माहिती पदवीधर मतदार मंडळ अधिकारी भरुन ते तहसिलदार कार्यक्रम अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करु शकतात. पुर्वी मतदार असलेल्या मतदारांनीही नव्याने नोंदणी करायची आहे, असेही श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले.
मतदार यांद्याचा पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

अ.क्र.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे
दिनांक
1
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहिर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक
दि. 1 ऑक्टोबर, 2019 (मंगळवार)
2
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी
दि. 15 ऑक्टोबर, 2019 (मंगळवार)
3
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिध्दी
दि. 25 ऑक्टोबर, 2019 (शुक्रवार)
4
नमूना 18 किंवा 19 व्दारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक
दि. 6 नोव्हेंबर, 2019 (बुधवार)
5
हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई
दि. 19 नोव्हेंबर, 2019 (मंगळवार)
6
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी
दि. 23 नोव्हेंबर, 2019 (शनिवार)
7
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
दि. 23 नोव्हेंबर, 2019 (शनिवार) ते
दि. 9 डिसेंबर, 2019 (सोमवार)
8
दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे
दि. 26 डिसेंबर, 2019 (गुरुवार)
9
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी
दि. 30 डिसेंबर, 2019 (सोमवार)

*****

25 September, 2019

महिला,तरुणांची मतदान टक्केवारी वाढवा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या स्वीप समिती बैठकीत सूचना






महिला,तरुणांची मतदान टक्केवारी वाढवा
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या स्वीप समिती बैठकीत सूचना

       हिंगोली, दि.25 : महिला आणि तरुणांची मतदानातील टक्केवारी वाढवा, त्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दिल्या.
          जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हास्तरीय स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, उपजिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी राजू नंदकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीप समितीच्या नोडल अधिकारी रेणुका तम्मलवार आदी उपस्थित होते.
          श्री. जयवंशी यांनी सांगितले की, मतदान प्रक्रियेत महिला आणि तरुणांचा सहभाग वाढायला हवा. त्यासाठी स्वीपचा आराखडा तयार करा. महिलांचा सहभाग वाढण्यासाठी महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट, बँक सखी, कृषी सखी यांची मदत घ्या.
          जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे. त्यामध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करावी. मतदारांचे प्रबोधन करावे, असेही श्री. जयवंशी यांनी सांगितले.
          बैठकीस प्रकल्प संचालक प्रविणकुमार घुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे, प्राथमिक  शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रा. विक्रम जावळे, औंढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव, सेनगाव नगर पालिकेचे  मुख्याधिकारी शैलेश फडसे आदी उपस्थित होते.
घंटागाडीवरुन होणार मतदार जनजागृती
हिंगोली , कळमनुरी  नगर परिषदेच्या घंटागाडीद्वारे मतदार जनजागृती करण्याचा निर्णय  बैठकीत घेण्यात आला. हिंगोली नगर परिषदेच्या 24 आणि कळमनुरी नगर परिषदेच्या 15 घंटागाडी आहेत. या गाडीवरुन मतदार जनजागृती केली जाणार आहे. याचबरोबर शिक्षण विभागाकडून विविध स्पर्धा, योग क्‌लब , नवरात्र मंडळ येथेही मतदार जनजागृती केली जाणार आहे, असे श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी सांगितले.
000000

20 September, 2019

गोरेगाव अपर तहसीलदारपदी व्ही. यु. भालेराव यांची नियुक्ती


 गोरेगाव अपर तहसीलदारपदी
व्ही. यु. भालेराव यांची नियुक्ती

हिंगोली, दि.20 : हिंगोली जिल्हयातील सेनगाव तालुक्यात गोरेगाव अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता  देण्यात आली. गोरेगाव अपर तहसीलदार कार्यालयाकरीता अपर तहसीलदार पद मंजूर झाले असून प्रभारी अपर तहसीलदार व्ही.यु.भालेराव व लिपीक टंकलेखक बबन व्यवहारे यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
         हिंगोली जिल्हयातील तहसीलदार कार्यालय सेनगाव तसेच गोरेगाव अपर तहसीलदार कार्यालय यांच्या कार्याक्षेत्रात खालील प्रमाणे महसुली मंडळे तलाठी साझे व त्याअंतर्गत गावे राहतील.

अ.क्र.
कार्यालयाचे नाव
महसूल मंडळाचे नांव
साझाचे नांव
एकूण महसूली गावे
1
तहसीलदार सेनगाव
1.सेनगाव
1.सेनगाव 2.पुसेगाव
3.खुडज
4.जांभरुन - 5.आडोळ - 6.सापटगाव - 7.खिल्लार
सेनगाव , मकोडी,बरडा.
पुसेगाव , वरुड समद ,वरुड काजी,
खुडज , लिंगदरी , गोंडाळा,
जांभरुन , रिधोरा , तळणी,पार्डी,
आडोळ ,रेपा, लिंग पिंपरी, पिंपरी लिंग,
सापटगाव, सिंनगी नागा,सुकळी खु.,सुकळी बु.
खिल्लार,उमरदरी,हनकदरी,जामदया,हुडी,लिंबाळा हुडी.


2.साखरा
1.साखरा
2. जयपुर
3. केलसुला
4. खडकी
5. वझुर खु.
6. कापडसिंगी
साखरा , हिवरखेडा , धोतरा ,बोरखडी पी.
जयपुर , वाढोणा
केलसुला ,वेलतुरा ,घोरदरी
खडकी , बोरखेडी , सोनसावंगी , बामणी खु.
वझुर खु.,बन , बरडा ,पिंपरी ,धानोरा बु.
कापडसिंगी ,उटीपुर्णा , सालेगाव ,नानसी ,डोंगरगाव.



3.पानकन्हेरगाव
1.पानकन्हेरगाव
2. म्हाळशी 
3.मन्नास पिंपरी 
4. वटकळी
5. कहाकर बु.
6. कवठा बु.
पानकन्हेरगाव
म्हाळशी ,शेगाव ,खैरखेडा
मन्नास पिंपरी , वलाना ,बटवाडी ,माहेरखेडा
वटकळी, सुलदली खु. ,दाताडा खु. ,दाताडा बु.
कहाकर बु.,वाघजाळी , वरखेडा.
कवठा बु., कोळसा ,कोंडवाडा ,कवरदरी



4.हत्ता
1. हत्ता
2. उटी ब्रम्हचारी
3. वरुड चक्रपान
4.वडहिवरा
5.लिंबाळा आमदरी
6.सिनगीखांबा 
हत्ता , हत्ता तांडा ,भंडारी ,गणेशपुर ,खैरी घुमट
उटी ब्रम्हचारी ,होलगीरा ,पाटोदा
वरुड चक्रपान ,म्हाळसापुर ,भानखेडा,बेलाला
वडहिवरा,चिखलागर ,मांडवाडी ,ब्रम्हवाडी ,जांब आंध
लिंबाळा आमदरी ,आमदरी ,लिंबाळा तांडा,कारला, बोडखा, तांदुळवाडी , चिंचखेडा,येलदरी
सिनगीखांबा ,कहाकर खु.,सावरखेडा ,गारखेडा

2
अपर
तहसीलदार,
गोरेगाव
1.गोरेगाव
1.गोरेगाव
2. बाभुळगाव
3. सवना
4. चौढी बु
5. कडोळी
6. माझोड     
गोरेगाव
बाभुळगाव
सवना , वायचाळ पिंपरी
चौेढी बु, चोंढी खु.,ब्राम्हणवाडा
कडोळी ,गारखेडा,सुरजखेडा,तपोवन
माझोड,भगवती,पवती,गुगळ पिंपरी



2. आजेगाव
1.आजेगाव
2.पळशी
3. हाताळा
4. जवळा बु,
5. केंद्रा बु.
6.शिंदेफळ
आजेगाव
पळशी ,साबलखेडा , धनगरवाडी
हाताळा , ताकतोडा , जामठी बु.
जवळा बु, सुलदली बु.,देऊळगाव जहागीर,चांगेफळ
केंद्रा बु.,केंद्रा खु.,हिवरा ,गोंदनखेडा
शिंदेफळ , शिवणी बु.,शिवणी खु.,बेलखेडा,कारेगाव.

000000











17 September, 2019




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
हुतात्म्यांना अभिवादन 

हिंगोली,दि.17:     मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक मंचक ईप्पर, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार,  अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
             प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी  ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक,  लोकप्रतिनिधी, अधिकारी,  पदाधिकारी,  नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
            यावेळी  उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, तहसिलदार गजानन शिंदे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घुबडे यांच्यासह  पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****





जिल्हाधिकारी कार्यालयात रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

        हिंगोली, दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी निवडणूक राजु नंदकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी रोहयो अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र बागडे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसिलदार गजानन शिंदे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****


13 September, 2019

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सूट



       
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सूट
हिंगोली,दि.13 : सण, उत्सवात ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार दहा दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.
            ध्वनीक्षेपकाचा वापर गणपती उत्सव 01 दिवस दिनांक 12 सप्टेंबर , नवरात्री उत्सव 02 दिवस 7 व 8 ऑक्टोबर , दिवाळी 01 दिवस दिनांक 27 ऑक्टोबर (लक्ष्मीपुजन) , ख्रिसमस 01 दिवस दिनांक 25 डिसेंबर , 31 डिसेंबर एक दिवस या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सुट  या जिल्ह्यापूरती राहील असे आदेशात म्हटले आहे.

*****



मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध


मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध

हिंगोली,दि.13:  महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख)  व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात दि. 14 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2019  पर्यंत  पोलीस कर्मचाऱ्यांना  वार्षिक गोळीबार  सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे.  दिनांक 14,18,21,28 सप्टेंबर आणि 2,5,9,12,16,19,23,26, 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत या दिनांकांस पुढील अटी वर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे  परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही  व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस  स्टेशन हट्टा  यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
000000