पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणी करा : जिल्हाधिकारी
हिंगोली,दि.30: औरंगाबाद
पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जात असून पदवीधरांनी आपली
नाव नोंदणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यांनी आज येथे केले.
भारत
निवडणूक आयोगाने एक नोव्हेंबर, 2019 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर
मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार
जिल्ह्यातील सर्व पदवीधरांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी
जयवंशी यांनी आज येथे सांगितले.
नमुना
अठरा क्रमांकाच्या अर्जात माहिती पदवीधर मतदार मंडळ अधिकारी भरुन ते तहसिलदार
कार्यक्रम अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करु शकतात. पुर्वी
मतदार असलेल्या मतदारांनीही नव्याने नोंदणी करायची आहे, असेही श्री. जयवंशी यांनी
स्पष्ट केले.
मतदार
यांद्याचा पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
अ.क्र.
|
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे
|
दिनांक
|
1
|
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम
31 (3) अन्वये जाहिर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक
|
दि. 1 ऑक्टोबर, 2019 (मंगळवार)
|
2
|
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे
कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी
|
दि. 15 ऑक्टोबर, 2019 (मंगळवार)
|
3
|
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे
कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुर्नप्रसिध्दी
|
दि. 25 ऑक्टोबर, 2019 (शुक्रवार)
|
4
|
नमूना 18 किंवा 19 व्दारे दावे व
हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक
|
दि. 6 नोव्हेंबर, 2019 (बुधवार)
|
5
|
हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप
मतदार याद्यांची छपाई
|
दि. 19 नोव्हेंबर, 2019
(मंगळवार)
|
6
|
प्रारुप मतदार याद्यांची
प्रसिध्दी
|
दि. 23 नोव्हेंबर, 2019 (शनिवार)
|
7
|
दावे व हरकती स्वीकारण्याचा
कालावधी
|
दि. 23 नोव्हेंबर, 2019 (शनिवार)
ते
दि. 9 डिसेंबर, 2019 (सोमवार)
|
8
|
दावे व हरकती निकाली काढण्याचा
दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे
|
दि. 26 डिसेंबर, 2019 (गुरुवार)
|
9
|
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी
|
दि. 30 डिसेंबर, 2019 (सोमवार)
|
*****
No comments:
Post a Comment