मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
हुतात्म्यांना अभिवादन
हिंगोली,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 71
व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते
मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्ष
बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी एच. पी. तुम्मोड, राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक मंचक ईप्पर, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, अप्पर
जिल्हा पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन
करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी
यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी,
नागरिक, पत्रकार यांची
भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो)
श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण,
तहसिलदार गजानन शिंदे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.
घुबडे यांच्यासह पत्रकार, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी,
विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment