जनावरांच्या
वाहतुकीसाठी सक्षम प्राधिकरणचे प्रमाणपत्र आवश्यक
हिंगोली, दि.9: जनावरांची
वाहतुक करण्यापूर्वी आपल्या वाहनांमध्ये केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम
125 ई च्या तरतुदीनुसार वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन आपल्या वाहनाच्या
नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घ्यावे.
The
prevention of cruelty to Animals (Transport of Animals on Foot) Rules 2001 च्या
नियम 96 च्या तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतुक करताना वाहतुकदाराने सक्षम
प्राधिकरण तथा Animal Welfare Board of India यांनी तसेच केंद्र शासनाने प्राधिकृत
केलेल्या अधिकारी, व्यक्ती किंवा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले
प्रमाणपत्र सोबत बाळगावे. हे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांची वाहतुक
करण्यास वाहतुकदाराने नकार देणे अपेक्षित आहे.
तसेच The Prevention of cruelty to
Animals (Transport of Animals on Foot) Rules 2001 या कायदा व नियमांच्या
तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतुक करण्यात येऊ नये, उक्त
तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित कायदे नियमातील तरतुदीनुसार संबंधितांविरुध्द
कायदेशीर करवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी एका
प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment