आयोगांच्या सूचनांचे
काटेकोर पालन करा
जिल्हाधिकारी
जयवंशी यांच्या सूक्ष्म निरीक्षकांना सूचना
हिंगोली, दि. 15 : भारत
निवडणूक आयोगाच्या सूचनांचा अभ्यास करा. त्यानुसार कामकाज करा. कामकाज करताना
सूक्ष्म निरीक्षकांनी काटेकोर पालन करा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा
जिलहधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे दिल्या.
जिल्ह्यातील
तीन विधानसभा मतदारसंघातील नियुक्त करायच्या सूक्ष्म निरीक्षकांचे आज प्रशिक्षण
झाले. त्यावेळी श्री. जयवंशी यांनी या सूचना दिल्या. यावेळी भारत निवडणूक
आयोगाच्या निरीक्षक डॉ. रेणू राज, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर आदी
उपस्थित होते.
सूक्ष्म
निरीक्षकांनी मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल काळजीपूर्वक पार पाडायचे आहे. मॉक
पोल झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या सुरवात होण्यापूर्वी मॉकपोल न चुकता डिलीट
करावा. व्हिव्हिपॅट आणि ईव्हीएम यांची जोडणी करताना काळजी घ्यावी, अशा सूचना श्री.
जयवंशी यांनी दिल्या.
सूक्ष्म
निरीक्षकांनी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याबरोबरच विविध प्रकारचे फॉर्म अचूकपणे
भरावेत. या फॉर्ममध्ये माहिती भरताना आयोगाच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. शंका
असल्यास शंकाचे निरसन करुन घ्यावे, असे
श्री. जयवंशी यांनी सांगितले.
श्री.
नंदकर यांनी सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी टपाल
मतदानासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना आजच मागणी कळवावी, असे सांगितले.
मतदान
आणि मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळावी, अशी काही बॅक अधिकारी-कर्मचारी
यांनी मागणी केली. त्यावर निवडणूक कामकाजावर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना
दुसऱ्या दिवशी बँक अथवा त्यांच्या कार्यालयात गैरहजर राहण्यासाठी परवानगी
देण्याबाबत कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. त्याचबरोबर
सूक्ष्म निरीक्षकांचे मानधन रोखीने तात्काळ दिले जाईल, असेही श्री. जयवंशी यांनी
स्पष्ट केले.
*****
No comments:
Post a Comment