कलापथकाच्या कार्यक्रमातून
होणार मतदारांची जागृती
हिंगोली,
दि. 1 : जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातील गावा-गावांत
कलापथकाच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जाणार आहे. शाहीर प्रकाश दांडेकर
यांच्या पथकाव्दारे हे कार्यक्रम केले जाणार आहेत.
मतदान
प्रक्रियेत जास्तीत-जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, मतदानाची टक्केवारी वाढावी,
यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येत
आहेत. याचाच एक भाग म्हणून शाहीर प्रकाश दांडेकर यांचे पथक जनजागृतीचे काम करणार
आहे.
शाहीर
दांडेकर यांच्या पथकाचा आज जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत
जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपजिल्हा निवडणूक
अधिकारी राजीव नंदकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, जिल्हा माहिती
अधिकारी रवींद्र राऊत, स्वीप समितीच्या सदस्य सचिव रेणुका तम्मलवार उपस्थित होते.
शाहीर
दांडेकर यांचे पथक वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघातील विविध गावांत कार्यक्रम
घेणार आहेत. ज्या गावात मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्या गावात जनजागृती केली
जाणार आहे. शाहीर दांडेकर यांच्या पथकात किरण दांडेकर, अशोक केंद्रेकर, विठ्ठल
कांबळे यांचा समावेश आहे.
*****
No comments:
Post a Comment