कायदा व
सुव्यवस्था
निरीक्षक
दिपक कुमार
यांचे हिंगोलीत आगमन
हिंगोली,
दि.5 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी हिंगोली
जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली मतदार संघाकरिता भारतीय पोलीस सेवेतील
वरिष्ठ अधिकारी दिपक कुमार यांची कायदा व सुव्यवस्था निरीक्षक म्हणून नियुक्ती केली
आहे.
श्री. दिपक कुमार यांचे हिंगोली येथे आगमन झाले आहे. त्यांचे जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वागत केले. श्री. दिपक कुमार निवडणुकीबाबत
नागरिकांच्या समस्या, तक्रारी ऐकण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 10 ते 11 या
वेळेत उपलब्ध असतील त्यांचा संपर्क क्रमांक
7820874073 असा आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी चेरले त्यांचे संपर्क
अधिकारी आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक
9923588115 असा आहे.
*****
No comments:
Post a Comment