राष्ट्रीय
एकता दिनानिमित्त ‘एकता दौड’ संपन्न
हिंगोली, दि.31: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज
'राष्ट्रीय एकता दौड' व इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त 'राष्ट्रीय संकल्प
दिन' म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त अग्रसेन चौक - बसस्टँड - इंदिरा
गांधी चौक - महात्मा गांधी चौक पर्यंत राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले
होते. यावेळी एकता दौडला हिंगोली शहराचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राज्य राखीव
बलाचे समादेशक मंचक इप्पर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी हिरवी झेंडी
दाखवून एकता दौडचा शुभारंभ केला. यावेळी राज्य राखीव बलाचे अतिरिक्त समादेशक
आर.बी. जाधव, नायब तहसीलदार एम.जी खंडागळे, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन
फारुकी, क्रीडा अधिकारी संजय बेतेवार, मारोती सोनकांबळे, शारीरिक शिक्षण संघटनेचे
रमेश गंगावणे, योग विद्यालयाचे रत्नाकर महाजन, आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा क्रीडा
अधिकारी कलीमोद्दीन फारुकी
यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या एकता दौड मध्ये राज्य राखीव बलाचे जवान, पोलीस प्रशासनातील
अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक, खेळाडु,
स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, पत्रकार बंधू आदी सहभागी झाले होते.
*****
No comments:
Post a Comment