17 February, 2026

हिंद दि चादर या उपक्रमा अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा , मेंढवण येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

 



पालघर दि 17 फेब्रुवारी : खारघर , नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी आयोजित होणाऱ्या हिंद दि चादर गुरु तेजबहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमा निमीत्त डहाणू,प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मेंढवण येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

     सदर स्पर्धा ह्या श्री. गुरु तेजबहादुर साहिबजी यांचे जीवनचरित्र व बलिदान या विषयावर आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा तसेच मानवतेचा विचार त्यांच्या भाषणातून व्यक्त केला.या विषयावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, तर्कसंगत व प्रभावीपणे मांडणी केली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शुद्ध उच्चार, आशय घनता व सुसंगत मांडणी यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. 

या स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

*******


No comments: