जिल्हाधिकारी
कार्यालयात
सरदार
वल्लभभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन
हिंगोली, दि. 31 : सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी
श्री. मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष
तडवी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर आदिसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
अनिल भंडारी यांनी पुढीलप्रमाणे राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली : मी सत्यनिष्ठापूर्वक
शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित
करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन.
मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची
अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सुध्दा सत्यनिष्ठापूर्वक
संकल्प करीत आहे.
*****
No comments:
Post a Comment