राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता
दौडचे आयोजन
हिंगोली,
दि. 26 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मंगळवार दि. 31 ऑक्टोंबर
2017 या दिवशी “ राष्ट्रीय
एकता दिवस ” म्हणून साजरा करण्याचा संकल्प शासनाने
व्यक्त केला आहे. त्या निमित्ताने शहरात जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय
एकता दिवसाची शपथ, एकता दौड व पोलिस तसेच तत्सम यंत्रणांचे सायंकाळचे परेड संचलन, मानवंदना
या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहेत व त्याच बरोबर हा दिवस स्व. इंदिरा गांधी
यांच्या पुण्यतिथी दिवस असल्याणे राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून मिरवणुक, देशभक्तीपर
गाणी व सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या वक्त्यांची व्याख्याने इ. कार्यक्रमाचे आयोजन
करण्याचे असल्याने हिंगोली जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे अग्रेसेन चौक येथे राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन दि. 31 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 7.00 वा. करण्यात आले आहे. एकता दौडची
सुरुवात खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षा, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,
पोलिस अधिक्षक, नगराध्यक्ष व जिल्ह्यातील विविध शासकिय व निमशासकिय अधिकारी / कर्मचारी
तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
एकता दौडचे
मार्ग पुढील प्रमाणे असणार
आहे. अग्रेसन चौकापासून सुरुवात, बसस्टँड, स्व. इंदीरा गांधी
चौक आणि महात्मा गांधी चौक येथे समारोप होणार आहे. तरी सदरील राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील शाळा,
महाविद्यालयातील मुला-मुलींनी, जिल्ह्यातील नागरीकांनी, खेळाडूंनी, स्वयंसेवी संस्था,
युवक मंडळे, क्रीडा मंडळे यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र
पवार यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment