जिल्हाधिकारी
कार्यालयात स्वच्छता अभियान
हिंगोली,दि.08: स्वच्छ
भारत अभियान अंतर्गत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीतील स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. रविवार
असूनही जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जिल्हाधिकारी अनिल
भंडारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू, घासणी, फावडे, घेऊन
कार्यालय परिसर स्वच्छ करण्यासाठी उतरले होते. यावेळी
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील स्वत: हातात ब्रश-घासणी घेवून कार्यालय परिसराची स्वच्छता केली. नेहमी कार्यालयीन
कामकाजात व्यस्त असणारे अधिकारी-कर्मचारी आज साफसफाई करण्यात व्यस्त झाले
होते. इमारत परिसरातील भिंतीवर तंबाखु-गुटखा खाऊन जागो-जागी थूंकलेल्या जागी
अधिकारी-कर्मचारी यांनी हातात ब्रश घेऊन त्याची साफसफाई केली.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की जिल्ह्यातील सर्व
शासकीय कार्यालये, तहसील कार्यालये याठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात येत आहे. स्वच्छता
हि केवळ मोहिमेपुरती न ठेवता शासकीय कार्यालये सदैव कशाप्रकारे स्वच्छ ठेवता येईल यासाठी
सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय
इमारतीतील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी
यांनी आज उत्कृष्टरित्या स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला आहे. येणाऱ्या
काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील परिसराची देखील अशाच प्रकारे
साफसफाई करण्यात येईल. या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रत्येकाने सार्वजनीक
ठिकाणी कचरा करायचा नाही
तसेच तंबाखू-गुटखा खाऊन भिंतीवर थूंकयाचे नाही असे ठरवून आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे होईल यासाठी
प्रयत्न करावा. असेही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले.
प्र. निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांनी देखील
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणार असून यासाठी
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्श तडवी, नगर
परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, नायब
तहसीलदार श्री. मिटकरी, सहायक नियोजन अधिकारी श्री. आव्हाड, स्वीय सहायक श्री.
बोलके आणि श्री. वानखेडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि नगर परिषदेचे कर्मचारी
यांनी या स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती
प्रशासकीय इमारतीची स्वच्छता केली.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह
त्यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचारी यांनी या स्वच्छता माहिमेत सक्रीय सहभाग नोंदवून
कार्यालय परिसराची स्वच्छता केली.
*****
No comments:
Post a Comment