खाजगी ऑटोरिक्षाची परिवहन
संवर्गात नोंदणी करण्यास मुदतवाढ
हिंगोली,
दि. 27 : खाजगी संवर्गात नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षा परिवहन संवर्गात नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2018
पर्यंतच असणार आहे. ऑटोरिक्षा
व टॅक्सी चालकांनी याची नोंद घेऊन उप प्रादेशिक परिवहन
कार्यालय,
हिंगोली येथे अर्ज करून परवाने घेण्यात यावे,
असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
अशोक पवार यांनी केले आहे.
ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांची
संख्या मर्यादित ठेवण्यासाठी राज्य
परिवहन प्राधिकरणाद्वारे तसेच राज्यातील इतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी तीन चाकी, तीन आसनी काळया पिवळया, ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या संख्येवर अथवा नव्याने परवाने जारी करण्यावर घातलेले निर्बंध शासन निर्णय दि. 22 सप्टेंबर 2017 अन्वये उठविले आहेत.
खाजगी संवर्गात
नोंदणी असणाऱ्या ऑटोरिक्षा नवीन परवान्यावर परिवहन संवर्गात नोंदणी करताना अथवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. याकरिता अर्जदारास विहित नमुन्यातील अर्ज, परवाना शुल्क, शासनाने विहित केलेले अतिरिक्त परवाना
शुल्क अदा करावे लागणार आहे. जे
अर्जदार दि. 18 जुलै, 2017
रोजीच्या शासन
निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करतील अशा ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परवाने जारी करण्यात येणार आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
*****
No comments:
Post a Comment