15 September, 2017

 ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियानास आजपासून सुरुवात
·         जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्वच्छतेची शपथ देवून केली अभियानाची सुरुवात

        हिंगोली, दि.15: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी अधिकारी-कर्मचारी यांना स्वच्छता शपथ देवून ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाची आजपासून सुरुवात केली.
             2 ऑक्टोबर 2014 पासून सुरू झालेल्या  स्वच्छ भारत अभियानास यावर्षी तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सेवा दिवस, समग्र स्वच्छता दिवस, सर्वत्र स्वच्छता दिवस, श्रेष्ठ स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध घटकातील समुदायांना एकत्रित करून त्यांना श्रमदानात सहभागी करून घेणे, शहरातील बस स्थानक, पाणीसाठे, पर्यटनस्थळे स्वच्छता, बाजार, उद्याने, दवाखाने, स्मारक, सार्वजनीक ठिकाणे, सार्वजनीक शौचालय, तलाव आणि स्वच्छता गृहाची व्यापक प्रमाणात सफाई कार्यालये यांची स्वच्छता करणे तसेच शहरातील प्रसिद्घ स्थळांची स्वच्छता करणे, जागतिक पर्यटन दिन (27 सप्टेंबर) अनुषंगाने जिल्ह्यात धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांची स्वच्छता आदी कार्यक्रम अंतर्भूत आहेत. या मोहिमेत जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी केले.

*****
 

No comments: