15 September, 2017

जिल्ह्याखरीप हंगामात 24 तासात सरासरी 11.95 मि.मी. पाऊस

          हिंगोली, दि. 15 :  जिल्ह्यात शुक्रवार, दिनांक 15 सप्टेंबर, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 59.74 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी 11.95  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 537.90 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 60.42 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  शुक्रवार दि. 15 सप्टेंबर, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 17.14 (569.70), वसमत - 2.43 (535.14), कळमनुरी - 12.00 (345.34), औंढा नागनाथ - 17.50  (714.00) , सेनगांव - 10.67 (525.33). आज  अखेर  पावसाची सरासरी 537.90 नोंद झाली.
*****  
वृत्त क्र. 458                                                                                                                               
पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 15 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 16 व 17 सप्टेंबर, 2017 रोजी या कालावधीत हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार, दि. 16 सप्टेंबर, 2017 रोजी दुपारी 03.00 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 05.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन आणि रात्री मुक्काम करतील.
रविवार, दि. 17 सप्टेंबर, 2017 रोजी सकाळी 8.40 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्तंभ, नगरपरिषद उद्यान, देवडानगर येथील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 09.00 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्तंभ, नगरपरिषद उद्यान, देवडानगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज वंदन समारंभास उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता शासकीय शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून शासकीय वाहनाने जवळा (बु.) ता. सेनगांव जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील. दुपारी 01.30 वाजता जवळा (बु.) ता. सेनगांव जि. हिंगोली येथे आगमन व श्री. रामरतन शिंदे यांच्या निवासस्थानी भेट व राखीव. दुपारी 02.30 वाजता जवळा (बु.) ता. सेनगांव जि. हिंगोली येथून शासकीय वाहनाने जिंतूर-जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.  
*****


No comments: