08 September, 2017

महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 8 :  जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) वर्ल्ड कप स्पर्धा दि. 6 ते 24 ऑक्टोबर, 2017 या कालावधीत भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडासंस्कृती रुजविण्याचाड्रिम प्रोजेक्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केला आहे. राज्यातील व हिंगोलीजिल्ह्यातील मुला-मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला असून सर्व  शाळा / संस्थांनी या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे. तसेच या उपक्रमात शहरातील लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरीक, व्यापारी संघटना, बार असोसिएशन, नगर परिषद, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस, जिल्हाधिकारीकार्यालय, पत्रकार संघ, तंत्रनिकेतन महाविद्यालय, आय.टी.आय, जिल्हा फुटबॉल संघटना, विविध क्रीडा मंडळे व वरिष्ठ खेळाडू यांचाही सहभाग असणार आहे.
या उपक्रमामध्ये आपल्याही कार्यालयाचा, संस्थेचा सहभाग नोंदवावा असे अपेक्षितअसून त्यानुसार फुटबॉल खेळात सहभागी होणाऱ्या आपल्या कार्यालयातील खेळाडूंची यादी तयार करून या कार्यालयास दि. 13 सप्टेंबर, 2017 पर्यंत पाठविण्यात यावी तसेच सॉफ्ट कॉपी कार्यालयाच्या ई-मेल dsohingoli01@gmail.com वर टाकावी. फुटबॉल महोत्सव हा दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9.00 वा. जिल्हा परिषद प्रशाला, हिंगोली येथे आयोजित केलेला आहे. या महोत्सवात आपल्या कार्यालयाचा, संस्थेचा संघ खेळाडूच्या गणवेशात सहभागी करून महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन हा शासकिय उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे. या महोत्सवात प्रथम येणाऱ्या संघाना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार 9420290232, क्रीडा अधिकारी किशोर पाठक 9960690794, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार 9423306345, क्रीडा अधिकारी संतोष फुफाटे 9404597005 तरी या उपक्रमात उत्फुर्तपणे सहभाग नोंदवावा व जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्माण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

***** 

No comments: