04 September, 2017

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सूट

            हिंगोली, दि. 4 : सण, उत्सवात ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार दहा दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी, अनिल भंडारी यांनी काढले आहेत.
            ध्वनीक्षेपकाचा वापर गणपती उत्सव पाच दिवस (स्थापना दिवस, दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमी व नवमी), दिवाळी लक्ष्मीपुजन एक दिवस, ख्रिसमस एक दिवस, 31 डिसेंबर एक दिवस या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सुट  या जिल्ह्यापूरती राहील असे आदेशात म्हटले आहे.

*****

No comments: