11 September, 2017

वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव वी. गिरिराज यांनी घेतला
विविध विभागांचा आढावा

                हिंगोली,दि.11: राज्याचे वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव वी. गिरिराज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विभागांतील संवर्गनिहाय कार्यपध्दती, भरलेली व रिक्त पदे आणि विभागातंर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. यावेळी श्री. गिरीराज यांनी समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, पुर्णा पाटबंधारे, जलसंधारण, महसूल आणि जिल्हा परिषद या विभागांचा आढावा घेतला.
 यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी अनिल भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. हिवाळे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त भाऊसाहेब चव्हाण, पुर्णा पाटबंधारे विभागाचे श्री. अंबाडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, जलसंधारण विभागाचे प्रफुल्ल खिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

*****

No comments: