25 September, 2017

अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागचा छापा

हिंगोली, दि.25: हिंगोली तालूक्यातील मौ. पेडगाव येथील शेकुराव तुकाराम पोले, वय वर्ष 35 या इसमास देशी दारुची अवैध विक्री करीत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज छापा मारुन सदर इसमास अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या या छाप्यात देशी दारु भिंगरी संतराच्या 16 सिलबंद बाटल्या ज्याची सुमारे रु. 842 रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 ङ अन्वये संबंधीत इसमावर गुन्हा रजिस्टर क्रमांक 46/2017 नोंदविण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागने दिली आहे.
गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आरोपींनी मौ. सिरसम येथील डी.बी. जैस्वाल यांच्या देशी दारु किरकोळ विक्री दुकानातून विनापरवाना आणलेला असल्याचे व मागील अनेक महिन्यापासून विनापरवाना देशी दारुवरील दूकानदारांकडून आणून त्याची विक्री करीत असल्याचा जबाब आरोपीने दिला आहे. यामुळे संबंधित देशी दारु दुकानदार डी.बी. जैस्वाल यांनाही कारणे दाखवा नोटीस देवून अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती निलंबीत अथवा रद्द का करण्यात येवू नये ? अशी विचारणा करण्यात आली आहे. अनुज्ञप्तीधारकाचे समाधानकारक उत्तर प्राप्त न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधीताची अनुज्ञप्ती निलंबीत अथवा रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती ही राज्य उत्पादन शुल्क विभागने दिली आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूक आदर्श आचारसंहिता कालावधीत सर्व अनुज्ञप्तीधारकाने आचार संहितेचे अनुज्ञप्तीच्या नियम व अटीचे पालन करावे, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
***** 

No comments: