संवादपर्व कार्यक्रमात विविध योजनांची
माहिती
हिंगोली
दि. 5 : शहरातील रिसाला बाजार येथील विघ्नहर्ता गणेश मंडळ येथे याही
वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समाज कल्याण विभागातर्फे संवादपर्व
कार्यक्रमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली.
उदघाटन
आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाचालक मनिष
खुराणा, निनाजी कांडलेकर यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी
समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात
येणाऱ्या कन्यादान योजना, रमाई घरकुल योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना,
अपंगासाठीच्या योजना अपंगासाठी स्वावलंबन स्मार्ट कार्ड योजना, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजना आदी योजनाची माहिती दिली.
सूत्रसंचालन
विष्णू भोजे यांनी केले तर आभार बी. टी. दवणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनिल
वडकुते, संतोष होडबे, राहूल गायकवाड, राठोड, मुंढे आदींनी परिश्रम घेतले.
*****
No comments:
Post a Comment