04 September, 2017

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

हिंगोली, दि. 4 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग,मंत्रालय, मुंबई यांचे विभागाकडून शासन निर्णय क्र. अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6 दिनांक 11 ऑक्टोबर 2013 च्या तरतुदीनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अतंर्गत जिल्हयात ज्या मदरसा धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरसांना  मदरशांच्या आधुनिकीकरणांसाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी व शिक्षकांसाठी मानधनासाठी  शासन स्तरावर अनुदान उपलब्ध होणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत 1) मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरशांना सदर योजनेचा लाभ दिला जाईल. 2) ज्या मदरसांना Scheme for providing qulity education in madarasa या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. 3) शासन निर्णयात नमुद पायाभूत सुविधांसाठी रु. 2 लाख अनुदान देय आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही. 4) शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्त 3 डी. एड/बी. एड. शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी /  इंग्रजी / मराठी / उर्दु यापैकी एका माध्यमांची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणुक करणे आवश्यक राहील. 5) सदर अनुदान शासन निर्णयामध्ये नमुद पायाभूत सुविधा वगळून इतर सुविधांसाठी अनुज्ञेय असणार नाही. 6) शासन निर्णय क्र. अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6 दि. 11 ऑक्टोबर 2013, अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी https:// mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 7) अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे सदर योजनेचे शासन निर्णय क्र. अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6 दिनांक 11 ऑक्टोंबर 2013 मधील सर्व अटी व शर्ती लागु राहतील.         
तरी जिल्हयातील इच्छुक मदरसांनी अल्पसंख्याक विकास विभाग, शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2013 मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 18 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावे व सदर योजनेचा लाभ घ्यावा, विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी  यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                            *****  

No comments: