‘महाराष्ट्र
वार्षिकी’ सर्वांसाठी उपयुक्त
-- जिल्हाधिकारी
अनिल भंडारी
हिंगोली, दि.14: शासनाच्या विविध योजना, विभाग,
मंत्रीमंडळ निर्णय, महाराष्ट्राचा इतिहास, भुगोल, परंपरा, कलासंस्कृती महत्वाच्या
घडामोडी यासारखी महत्वाची माहिती "महाराष्ट्र वार्षिकी 2017" या
ग्रंथातून मिळणार असून सदर ग्रंथ सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे प्रतिपादन
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रसिद्ध केलेला
"महाराष्ट्र वार्षिकी 2017" या ग्रंथाची प्रत जिल्हा माहिती अधिकारी
अरुण सुर्यवंशी यांनी आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना भेट म्हणून दिली.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
एच.पी. तुम्मोड, पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनाही या ग्रंथाची प्रत देण्यात
आली.
महाराष्ट्राची ऐतिहासिक व सांख्यिकी माहितीसह
जिल्ह्यांच्या माहितीचाही या ग्रंथात समावेश केलेला आहे. माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेला हा संदर्भ ग्रंथ अभ्यासक, स्पर्धा परीक्षा देणारे
विद्यार्थी व नागरीकांना उपयुक्त ठरणार आहे. या संदर्भ ग्रंथात महाराष्ट्राची भूमी
आणि लोक, शासनाचे विभाग, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्ट्राची
परंपरा, राज्यातील जिल्हे, गत वर्षातील राज्य शासनाच्या संदर्भात महत्वाच्या घडामोडी,
भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय,
केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्ट्र विधीमंडळ सदस्य, संसद सदस्य,
दृष्टीक्षेपात महाराष्ट्र, आदी माहितीचा समावेश आहे. या ग्रंथाची किंमत 300 रुपये
असून जिल्हा माहिती कार्यालय, दूसरा मजला मध्यवर्ती प्रशासकीय
इमारत, हिंगोली दूरध्वनी क्रमांक. 02456-222635 येथे हा
ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहे.
*****
No comments:
Post a Comment