04 September, 2017

अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 4 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सन 1982 पासून प्रतिवर्षी अपंग राज्य पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी दि. 3 डिसेंबर या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सन 2017 साठीचे पुरस्कार देण्यात येतील. सदरच्या पुरस्कारांचे स्वरुप पुढीलप्रमाणे असणार आहे.
            यात उत्कृष्ट कर्मचारी / स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती आणि उत्कृष्ट नियुक्तक संस्था असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यामध्ये स्वयं उद्योग करणाऱ्या अपंग व्यक्ती किंवा कर्मचारी यांना उत्कृष्ट अपंग कर्मचारी / स्वयं उद्योजक पुरस्कार देण्यात येतो. सदरचा पुरस्कार शासकीय / निमशासकीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रामधील अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर व मतिमंद प्रवर्गातील व्यक्तींना देण्यात येतो. तसेच जास्तीत-जास्त अपंग व्यक्तींना त्यांच्या आस्थपनेत नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय / सार्वजनिक / खाजगी क्षेत्रातील संस्थेला उत्कृष्ट नियुक्तक म्हणून पुरस्कार दिला जातो.
            या पुरस्काराकरिता पात्र अपंग व्यक्ती / संस्था / अपंगाचे नियुक्तक यांच्याकडून प्रस्ताव / अर्ज मागविण्यात येत आहेत. पुरस्काराकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली यांचेकडे उपलब्ध असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि. 08 सप्टेंबर, 2017 रोजीपर्यंत आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: