पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत आयोजित निबंध
व लघुपट स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 4 : स्वच्छ भारत मिशन
( ग्रामीण ) अतंर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत ‘स्वच्छ संकल्पसे स्वच्छ
सिध्दी’ निबंध स्पर्धा तर भारताला स्वच्छ बनविण्यात माझे योगदान या विषयावर ही जिल्हयातील सर्व शाळा,विद्यालय व महाविद्यालयामध्ये घेण्यात
येणार आहे. हि निबंध स्पर्धा 18 वर्षाखालील व 18 वर्षा वरील या निबंध स्पर्धेकरिता
प्रथम बक्षिस 15 हजार , द्वितीय बक्षिस 10 हजार रुपये, तृतीय बक्षिस 5 हजार रुपये असणार
आहे.
लघुपट
स्पर्धेचे ( Short Film) चे आयोजन केले जाणार आहे. लघुपट स्पर्धेचा विषय भारताला स्वच्छ
बनविण्यात माझे योगदान या फिल्मसाठी वेळ मर्यादा 2-00 ते 3-00 मिनिट आहे. लघुपट प्रत्यक्ष
सी. डी., पेनड्राईव्ह मध्ये जिल्हा कक्षात आणुन देण्यात यावे किंवा nbahingoli@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात
यावेत. ही लघुपट स्पर्धा 18 वर्षाखालील व 18 वर्षावरील स्पर्धक व त्यापैकी जेष्ठ नागरिक व दिव्यांग गटात असणाऱ्या स्पर्धकांकरिता
असून त्यांचा राष्ट्रीय स्तरावर, सन्मानासाठी विशेष विचार केला जाणार आहे. हे लघुपट
दोन्ही गटांतील स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस 15 हजार, द्वितीय बक्षिस 10 हजार रुपये, तृतीय
बक्षिस 5 हजार रुपये व सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे
निकष पुढीलप्रमाणे असणार आहेत : कल्पक
आणि सुस्पष्ट विचार, साधी सरळ मांडणी, नवविचार विषयक पोहचण्यासाठी परिणामकारक मांडणी
असावी. निबंधातील मजकूर स्पर्धकांचा स्वतंत्र असावा इतरांचा मजकूर वापर केलेला असल्यास
सदर निबंध स्पर्धेतून बाद करण्यात येईल. निबंधातील मजकूर असभ्य, भितीदायक, मानहानीकारक
असावा मजकुराचा वापर केलेला निबंध स्पर्धेतून बाद करण्यात येईल. लघुपटाचे चित्रीकरण स्मार्ट फोन, कॅमेरा किंवा अन्य
डिजीटल रेकॉर्डच्या माध्यमातून करता येईल. तयार केलेला लघुपटाचे चित्रीकरण करण्यासाठी
वापरलेले तंत्रज्ञान त्या लघुपटाला पुन:प्रक्षेपित करण्यासाठी सुयोग्य त्या दर्जाचे
असावे. लघुपटापतील मजकूर राष्ट्रीय राज्यस्तरावरील आणि स्थानिक कायद्याचा भंग करणारा
नसावा. तसेच राष्ट्राची मानहानी होईल तसा नसावा. लघुपटाच्या फुटेज, म्युझिक , इमेजेस
इ. गोष्टी स्पर्धकांच्या स्वत:च्या असाव्यात.
लघुपट
चित्रफित व निबंध सादरीकरणासाठी अंतिम दि. 8 सप्टेंबर, 2017 पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता
मिशन कक्ष, जिल्हा परिषद, हिंगोली याठिकाणी सादर करावेत. संपर्क : एस. एस. मस्के मो.
9545119206 हिंगोली, विष्णू मेहत्रे
860027394 औंढा, प्रशांत कांबळे-9657521359 सेनगांव, राजेंद्र सरकटे-9850275730
कळमनुरी, प्रथमेश घोंगडे - 8788591316 वसमत यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या स्पर्धेत
जास्तीत-जास्त शालेय विद्यार्थी, युवक व नागरिकानी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment