12 September, 2017

तात्पुरते फटाके विक्री परवान्यासाठी 23 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत
हिंगोली, दि. 12 : दिपावली सणा निमित्ताने सन - 2017 करिता तात्पुरते फटाके परवाना (मोकळ्या जागेत) मिळणेसाठी दिनांक 13 ते 23 ऑक्टोबर, 2017 या कालावधीमध्ये किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करु इच्छीणाऱ्याना तात्पुरते फटाके परवाना मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांचे कार्यालयात विहित नमुन्यात (फॉर्म नं. 4) मध्ये दिनांक 23 सप्टेंबर, 2017 पर्यंत अर्ज करावेत, अशी सूचना अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
अर्जासोबत अर्जदाराच्या पासपोर्ट साईजच्या आकाराच्या तीन प्रतीत फोटो व संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसिलदार, पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र व अर्जदाराचे चारित्र्य प्रमाणपत्र, जागेच्या मालकीचा पुरावा व मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील, त्याशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
अर्जदाराचे संबंधित पोलीस स्टेशन कडील चारित्र्य प्रमाणपत्र व वर नमुद नाहरकत प्रमाणपत्र सादर केल्यास नियमानुसार तात्पुरते फटाका परवाना फीस चालनव्दारे भरून घेण्यात येईल. अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ते 23 सप्टेंबर, 2017 पर्यंत असून त्या नंतरचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच  दोन दुकानातील अंतर कमीत कमी 10 फुट असावे, दुकान मोकळ्या जागी व्यवस्थित कोणत्याही बांधकाम इमारतीपासून 150 फुटापेक्षा कमी अंतरावर लावली जाणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, स्टॉक मर्यादा 50 किलो राहील. याशिवाय परवान्यावर नमुद केल्याप्रमाणे सर्व अटी व शर्ती परवानाधारकावर बंधनकारक राहतील. ज्या ठिकाणी सरकारी जागेवर दुकान लावण्यात येतात अशा अर्जदारानी संबंधित तहसिलदार यांचे कडून जागा उपलब्ध असल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. व्यवसाय कर अधिकारी यांचे नादेय प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. तात्पुरता फटाका परवाना फीस रु. 200 चालानव्दारे भरणा करणे आवश्यक राहील, मुख्य नियंत्रक, पेट्रोलियम आणि स्फोटक नवी मुंबई यांचे पत्र. दि. 16 सप्टेंबर, 2014 मधील अटी व शर्ती बंधनकारक राहतील, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                 *****


No comments: