जिल्ह्यातील
रास्तभाव दुकानदारामार्फत अन्नधान्य व साखर पुरवठा
ई-पॉस
मशिनव्दारे अन्नदिन साजरा करण्यापूर्वी वाटप होणे आवश्यक
-- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 7 : जिल्ह्यामध्ये एकूण 795 रास्तभाव
दुकानदारामार्फत अन्नधान्य व साखर पुरवठा ई-पॉस मशिनव्दारे वाटप करण्यात येत आहे. शासनाचे
सुचनेनूसार अन्नधान्य रास्तभाव दुकानात अन्नदिन साजरा करण्यापूर्वी वाटप होणे आवश्यक
आहे.
ई-पॉस मशिनव्दारे धान्य वाटप व्यवहारांची संख्यामहिन्याच्या
सुरूवातीस कमी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे माहे सप्टेंबर, 2017 साठीचे
अन्नधान्य 15 सप्टेंबर पूर्वी जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांमार्फत योजनेतील
संबंधित सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वितरीत करण्यात यावे. तसेच माहे ऑक्टोबर,
2017 साठीचे अन्नधान्य वाटपाचे परमिट व त्यावरील अन्नधान्य हे दि. 15 सप्टेंबर पासून
शासकीय धान्य गोदामांतून रास्तभाव दुकानदारांना वाटपाची कार्यवाही करण्यात यावी व रास्तभाव
दुकानदारांनी माहे ऑक्टोबर 2017 मधील अन्नधान्य शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष
01 ऑक्टोबर पासून वाटप करण्याबाबत निर्देशित करण्यात येत आहे.
सर्व रास्तभाव दुकानदार यांना आदेशित करण्यात येते
की, माहे सप्टेंबर, 2017 साठी आपण आपल्या रास्तभाव दुकानाचे अन्नधान्याची रक्कम तात्काळ
बँकेत भरणा करून तहसिल कार्यालयात दाखल करावे व धान्य वाटपाची कार्यवाही दि. 15 सप्टेंबर,
2017 पूर्वी करण्यात यावी. तसेच माहे ऑक्टोबर 2017 साठीचे परमिट देखील दि. 15 सप्टेंबर,
2017 पासून बँकेत रक्कम भरणा करून तहसिल कार्यालयात दाखल करावे. या कामी उशीर करू नये
व सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य व साखर हे ई-पॉस मशिनव्दारे अंगठ्याच्या ठस्साची
ओळख पटवूनच वाटप करण्यात यावे.
सर्व शिधापत्रिकाधारक जनतेस अवाहन करण्यात येते की,
माहे सप्टेंबर 2017 साठीचे अन्नधान्य रास्तभाव दुकानात प्राप्त होताच ई-पॉस मशिनचा
वापर करूनच धान्य घेऊन जावे व आपली पावती घ्यावी.
माहे ऑक्टोबर 2017 साठीचे धान्य दि. 1 ऑक्टोबर,
2017 ई-पॉस मशिनव्दारे अंगठ्याचा ठस्साने ओळख पटवून घेऊन जावे व आपली धान्याची पावती
रास्तभाव दुकानदाराकडून जरून घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी निर्देशित
केलेले आहे.
*****
No comments:
Post a Comment