05 September, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 5 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 08 सप्टेंबर, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
शुक्रवार, दि. 08 सप्टेंबर, 2017 रोजी सकाळी 08.30 वाजता शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जालना-जिंतूर मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 03.00 वाजता हिंगोली जिल्ह्यातील सर्व विभागाच्या कामाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. सायंकाळी 06.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून शासकीय वाहनाने जिंतूर-जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

***** 

No comments: