हिंगोली येथे राष्ट्रीय एकता दौड
संपन्न
हिंगोली दि.31: सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या जयंती निमित्त हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे जिल्हाधिकारी अनिल
भंडारी आणि आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याहस्ते
राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ झाला यावेळी पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्यासह
अधिकारी-कर्मचारी तसेच जेष्ठ नागरिक व महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित
होते.
प्रारंभी सरदार
वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात
आले. आणि राष्ट्रीय ऐकतेची शपथ घेण्यात आली. हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात
झाली. सदर दौड अग्रसेन चौक येथून इंदिरा गांधी चौक मार्गे जाऊन महात्मा गांधी
चौक येथे विसर्जन करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment